चिंचोली येथे मंगळवारी कुस्ती मैदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:23 IST2021-02-08T04:23:09+5:302021-02-08T04:23:09+5:30
कोकरुड : चिंचोली (ता. शिराळा) येथील पै. जगन्नाथ आबा जाधव (वस्ताद) यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त मंगळवार, दि. ९ फेब्रवारी ...

चिंचोली येथे मंगळवारी कुस्ती मैदान
कोकरुड : चिंचोली (ता. शिराळा) येथील पै. जगन्नाथ आबा जाधव (वस्ताद) यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त मंगळवार, दि. ९ फेब्रवारी रोजी निकाली कुस्त्याचे मैदान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सुरेश जाधव व दिनेश जाधव यांनी दिली.
मैदानात प्रथम क्रमाकांची दत्ता बाणकर (कोल्हापूर)विरुद्ध रामा माने (काेल्हापूर). दुसऱ्या क्रमाकांची कुस्ती शुभम पाटील (वारणानगर)विरुद्ध अजय शेडगे (कोल्हापूर). तिसऱ्या क्रमाकांची कुस्ती विकी थोरात (ओंड)विरुद्ध सौरभ नांगरे (शेडगेवाडी) चाैथ्या क्रमाकांची कुस्ती मयूर जाधव (चिंचोली)विरुद्ध सुरज पाटील (फुपिरे). पाचव्या क्रमांकासाठी कुस्ती ओंकार जाधव (शेडगेवाडी)विरुद्ध अमर पाटील (शित्तूर) तर सहाव्या क्रमाकांची कुस्ती अथर्व पाटील (शेडगेवाडी)विरुद्ध अनिकेत तांबे (भेडसगाव) यांच्यात हाेणार आहे. याशिवाय इतर २८ कुस्त्यांचे नियोजन करण्यात आले आहे.