कुस्तीपटू संजना बागडीने महाविद्यालयाचा लौकिक वाढवला : विलास काळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:27 IST2021-04-04T04:27:12+5:302021-04-04T04:27:12+5:30
आष्टा : कुस्तीपटू संजना बागडी हिने राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धेत दैदिप्यमान यश मिळवत आष्टा महाविद्यालयाचा लौकिक वाढवला आहे, असे ...

कुस्तीपटू संजना बागडीने महाविद्यालयाचा लौकिक वाढवला : विलास काळे
आष्टा : कुस्तीपटू संजना बागडी हिने राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धेत दैदिप्यमान यश मिळवत आष्टा महाविद्यालयाचा लौकिक वाढवला आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. विलास काळे यांनी केले.
आष्टा येथील आर्टस् अँड काॅमर्स काॅलेजची विद्यार्थिनी संजना बागडी हिने राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धेत ७६ किलो वजन गटामध्ये तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य डाॅ. विलास काळे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिमखाना विभागाचे सदस्य प्रा. प्रदीप पाटील उपस्थित होते.
भारतीय कुस्ती महासंघाने आयोजित केलेल्या या राष्ट्रीय स्पर्धा नुकत्याच बेल्लारी-कर्नाटक येथे झाल्या. तिला जिमखाना विभागप्रमुख प्रा. अक्रम मुजावर यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो : ०३ आष्टा १
ओळ : आष्टा येथे कुस्तीपटू संजना बागडी हिचा प्राचार्य डॉ. विलास काळे, प्रा. अक्रम मुजावर, कवी प्रदीप पाटील यांनी सत्कार केला.