मिटकीत टेंभू योजनेच्या पाण्याचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:29 IST2021-05-20T04:29:29+5:302021-05-20T04:29:29+5:30

आटपाडी : मिटकी (ता. आटपाडी) येथे टेंभू योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनने आलेल्या पाण्याचे परिसरातल्या शेतकऱ्यांनी आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ...

Worship of Tembhu Yojana water in Mitki | मिटकीत टेंभू योजनेच्या पाण्याचे पूजन

मिटकीत टेंभू योजनेच्या पाण्याचे पूजन

आटपाडी : मिटकी (ता. आटपाडी) येथे

टेंभू योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनने आलेल्या पाण्याचे परिसरातल्या शेतकऱ्यांनी आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार स्वागत करून पूजन केले.

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, जिल्हा उपाध्यक्षा सौ. अनिता पाटील, सादिक खाटिक, वसंतदादा जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णूपंत चव्हाण, पंचायत समितीचे माजी सभापती विजयसिंह पाटील, दत्ता यमगर, राजेंद सावंत, विजय पुजारी, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष जालिंदर कटरे यांनी घोषणांच्या गजरात पाण्याचे केले.

क्रांतिवीर नागनाथआण्णा नायकवडी, डॉ. भारत पाटणकर आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या विजयाच्या घोषणा देत कृष्णामाईस वंदन करण्यात आले.

यावेळी कल्लाप्पा कुटे, समाधान भोसले, प्रशांत गवळी, मिटकीचे सरपंच दादा कोळेकर, दुर्योधन कोळपे, जगन्नाथ शामराव कोळपे, प्रकाश यमगर, आबा यमगर, संजय यमगर उपस्थित होते.

Web Title: Worship of Tembhu Yojana water in Mitki