आष्ट्यात श्री चौंडेश्वरी देवीची शेतकरी रूपात पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:22 IST2020-12-09T04:22:28+5:302020-12-09T04:22:28+5:30

आष्टा : येथील श्री चौंडेश्वरी मंदिरात ग्रामदैवत श्री चौंडेश्वरी देवीची शेतकऱ्याच्या रूपात पूजा बांधण्यात आली. पुजारी संतोष गुरव, ...

Worship of Shri Choundeshwari Devi as a farmer in Ashta | आष्ट्यात श्री चौंडेश्वरी देवीची शेतकरी रूपात पूजा

आष्ट्यात श्री चौंडेश्वरी देवीची शेतकरी रूपात पूजा

आष्टा : येथील श्री चौंडेश्वरी मंदिरात ग्रामदैवत श्री चौंडेश्वरी देवीची शेतकऱ्याच्या रूपात पूजा बांधण्यात आली. पुजारी संतोष गुरव, शीतल गुरव, महेश गुरव यांनी बळीराजाच्या रूपात देवीची पूजा बांधली. पूजा पाहण्यास भाविकांनी गर्दी केली होती. देवीचा महाभिषेक झाल्यानंतर देवीची पूजा बांधण्यात आली.

देवीच्या पुढील बाजूला बैलजोडी, तर पाठीमागील बाजूला ऊसशेती, एका हातात विळा, तर दुसऱ्या हातात चारा होता. पूजा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. श्री चौंडेश्वरी देवीची शाकंभरी नवरात्रासह, शारदीय नवरात्र, भावई उत्सव, नवरात्र, दीपावली या काळात आकर्षक रूपात पूजा बांधण्यात येते. भारत बंदनिमित्त देवीची शेतकऱ्यांच्या रूपात बांधण्यात आलेली पूजा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

फोटो : ०८१२२०२०-आयएसएलएम-चौंडेश्वरी न्यूज

श्री चौंडेश्वरी देवीची शेतकरी रूपात पूजा पुजारी संतोष गुरव, शीतल गुरव, महेश गुरव यांनी बांधली.

Web Title: Worship of Shri Choundeshwari Devi as a farmer in Ashta