सविता डांगे यांच्याकडून २५१ शिवलिंगांचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:49 IST2021-03-13T04:49:37+5:302021-03-13T04:49:37+5:30

चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिर परिसरात सविता डांगे यांनी शिवलिंगाचे पूजन केले. लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : चौंडी ...

Worship of 251 Shivlings by Savita Dange | सविता डांगे यांच्याकडून २५१ शिवलिंगांचे पूजन

सविता डांगे यांच्याकडून २५१ शिवलिंगांचे पूजन

चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिर परिसरात सविता डांगे यांनी शिवलिंगाचे पूजन केले.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : चौंडी (जि. अहमदनगर) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मंदिर परिसरात इस्लामपूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला मंडळाच्या अध्यक्षा सविता विश्वनाथ डांगे यांनी स्वत: २५१ शिवलिंग तयार करून महाशिवरात्रीनिमित्त विधिवत पूजा आणि अभिषेक केला.

सविता डांगे या गेल्या चार वर्षांपासून चौंडी येथे वास्तव्यास आहेत. अहिल्येश्वराच्या मंदिर परिसरात त्यांनी हा उपक्रम राबविला. चौंडी व परिसरातील महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध होऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचवावा, या हेतूने त्यांनी अत्याधुनिक पद्धतीचा गारमेंट उद्याेग उभा केला आहे. या लघुुउद्योगातून परिसरातील १५० कुटुंबांना रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे. त्यांच्या या उद्यमशीलतेमुळे महिलावर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: Worship of 251 Shivlings by Savita Dange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.