शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

सांगलीतील विश्वविक्रमी रंगावलीकार आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 15:53 IST

संपूर्ण विश्वात शिवराज्याभिषेकाच्या रांगोळीच्या माध्यमातून सांगली व महाराष्ट्राचे नाव कायमस्वरूपी कोरणाऱ्या सांगलीतील रंगावलीकार आर्थिक संकटात सापडले आहेत. विश्वविक्रमी रांगोळी उपक्रमासाठी उदार उसनवारी केली असताना आर्थिक मदतीचा ओघ कमी झाल्याने लाखो रुपयांच्या कर्जाचे ओझे त्यांच्या डोईवर आले आहे.

ठळक मुद्देपुरेशा मदतीअभावी रांगोळीचे बजेट ढासळलेउदार, उसनवारीवर उपक्रम केला पूर्ण, बिले भागविण्याची चिंता

सांगली : संपूर्ण विश्वात शिवराज्याभिषेकाच्या रांगोळीच्या माध्यमातून सांगली व महाराष्ट्राचे नाव कायमस्वरूपी कोरणाऱ्या सांगलीतील रंगावलीकार आर्थिक संकटात सापडले आहेत. विश्वविक्रमी रांगोळी उपक्रमासाठी उदार उसनवारी केली असताना आर्थिक मदतीचा ओघ कमी झाल्याने लाखो रुपयांच्या कर्जाचे ओझे त्यांच्या डोईवर आले आहे.

एकूण ३० लाख रुपये खर्चाचा हा उपक्रम असताना या रंगावलीकारांकडे केवळ ७ लाख रुपये जमा झाले आहेत. तरीही जिद्दीने व रसिकांना दिलेल्या शब्दाखातर त्यांनी ही रांगोळी पूर्णत्वास आणली आहे. एकीकडे कर्तव्य बजावताना ते आर्थिक विवंचनेत अडकले आहेत.दारातील रांगोळीला जगाच्या अंगणात प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम सांगलीतील रंगावलीकारांनी केले. यात आघाडीवर असलेले आदमअली मुजावर यांच्यासह जिल्ह्यातील शंभर कलाशिक्षक एकत्रित येऊन सांगलीच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सव्वा लाख चौरस फुटाची शिवराज्याभिषेक सोहळ्याची विश्वविक्रमी रांगोळी साकारत आहेत. रांगोळीचे अनेक विक्रम सांगलीने नोंदविले आहेत. व्यक्तिचित्राच्या रांगोळीचा सव्वा लाख चौरस फुटाचा मोठा विक्रम आता सांगलीतच नोंदला जाणार आहे.शिवाजी स्टेडियमवर २५0 फूट बाय ५00 फुटांची ही रांगोळी साकारण्यात येणार आहे. शंभर कलाशिक्षकांचे हात ही रांगोळी साकारत आहेत. १९ फेब्रुवारीस ही रांगोळी खुली करण्यात येणार आहे. शिवजयंतीनिमित्त एक अनोखा विक्रम, उपक्रम करण्याच्या हेतूने सर्व कलाशिक्षक एकत्रित आले आहेत.यासाठी एकूण ३0 टन रांगोळी व रंग लागली असून संपूर्ण विक्रम प्रस्थापित करेपर्यंतचा खर्च अंदाजे ३0 लाख रुपये आहे. लोकवर्गणीतून हा खर्च करण्यात येत असून आतापर्यंत ७ लाख रुपये जमा झाले आहेत. शिवराज्याभिषेक विश्वविक्रमी रांगोळी उत्सव समिती स्थापन करून त्याची रितसर नोंदणी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे केली असून, बँकेत खाते उघडण्यात आले आहे.राज्यभरातील लोकांकडून यासाठी मदतीचे आवाहन केले आहे. उपक्रमाशिवाय जो खर्च येणार आहे, तो सर्व खर्च कलाशिक्षक स्वत: करणार आहेत. या विश्वविक्रमासाठी गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिमका बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड, एशिया बुक, इंडिया बुक, गुगल बुक, ग्लोबल बुक, वर्ल्ड बुक, गोल्डन बुक, युनिक बुक अशा नऊठिकाणी आॅनलाईन नोंदणी करण्यात आली असून, एकाचवेळी या सर्व बुकात ही नोंद होणार आहे.रात्रं-दिवस राबून रांगोळी साकारणाऱ्यांना आता आर्थिक चिंता सतावत आहे. त्यामुळे त्यांनी शिवप्रेमींना व दानशुरांना मदतीचे आवाहन केले आहे.

टॅग्स :artकलाSangliसांगली