पेठनाका येथे आत्मनिर्भर भारत योजनेची कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:24 IST2021-02-08T04:24:08+5:302021-02-08T04:24:08+5:30

पेठ : भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राहुलदादा महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ येथील महाडिक शैक्षणिक संकुलात ...

Workshop on Self-Reliance India Scheme at Pethnaka | पेठनाका येथे आत्मनिर्भर भारत योजनेची कार्यशाळा

पेठनाका येथे आत्मनिर्भर भारत योजनेची कार्यशाळा

पेठ : भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राहुलदादा महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ येथील महाडिक शैक्षणिक संकुलात आत्मनिर्भर भारत अंतर्गत कार्यशाळा पार पडली. यावेळी आत्मनिर्भर भारत महाराष्ट्र प्रदेश संयोजक हर्षल विभांडिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र संयोजक संकेत खरपुरे, व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक महेश जोशी, प्रदेश सचिव प्रवीण फोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

हर्षल विभांडिक म्हणाले, महाराष्ट्रातील युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत बनविण्यासाठी व खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

यावेळी आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत असलेल्या योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. भविष्यात या योजनांचा लाभ सर्व युवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजप युवा मोर्चा विविध माध्यमांतून प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही महाडिक यांनी दिली. गरजू युवकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील आत्मनिर्भर केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्राचे पदाधिकारी आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. आदर्श पाटील यांनी केले तर प्रा. दत्तात्रय पाटील यांनी आभार मानले.

फोटो - ०७०२२०२१-आयएसएलएम-पेठनाका आत्मनिर्भर भारत न्यूज

पेठ येथे महाडिक शैक्षणिक संकुलात आत्मनिर्भर भारत अंतर्गत आयोजित कार्यशाळेत हर्षल विभांडिक यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Workshop on Self-Reliance India Scheme at Pethnaka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.