कार्यकर्त्यांनी निष्ठा ठेवून काम करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:35 IST2021-06-16T04:35:40+5:302021-06-16T04:35:40+5:30
चिकुर्डे (ता. वाळवा) येथे राष्ट्रवादी पक्ष प्रवेश कार्यक्रम व कोरोना प्रतिबंध किट वाटपप्रसंगी ते बोलत होते. राजेंद्र पांढरबळे ...

कार्यकर्त्यांनी निष्ठा ठेवून काम करावे
चिकुर्डे (ता. वाळवा) येथे राष्ट्रवादी पक्ष प्रवेश कार्यक्रम व कोरोना प्रतिबंध किट वाटपप्रसंगी ते बोलत होते. राजेंद्र पांढरबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
उपस्थित मान्यवरांचा सत्कार श्री लक्ष्मी दूध संस्था व पतसंस्थेच्या संचालकांच्या हस्ते करण्यात आला.
वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजय पाटील व राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. पांडुरंग पवार व समीर तांबोळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी नेताजी पाटील, शहाजी गायकवाड, चांदसोा तांबोळी, प्रकाश रसाळ, प्रताप पाटील, जंबू पांढरबळे, प्रकाश कांबळे, तात्यासाहेब कोरे रावसाहेब भोसले आदी उपस्थित होते. सुकुमार खांबे यांनी आभार मानले.