शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

महांकाली कारखान्याच्या कामगारांचा मोर्चा: थकीत पगारासह भविष्य निर्वाह निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 23:37 IST

अकरा महिन्यांच्या थकीत पगारासह इतर मागण्यांसाठी महांकाली साखर कारखान्याच्या हजारो कामगारांनी गुरुवारी कवठेमहांकाळ तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढला.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन , उपदान देण्याची मागणी; तीव्र आंदोलनाचा इशारा

कवठेमहांकाळ : अकरा महिन्यांच्या थकीत पगारासह इतर मागण्यांसाठी महांकाली साखर कारखान्याच्या हजारो कामगारांनी गुरुवारी कवठेमहांकाळ तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढला. यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

महांकाली साखर कारखान्याच्या कामगारांनी २४ एप्रिलपासून थकीत पगार, प्रॉव्हिडंड फंड, ग्रॅच्युईटी मिळावी, यासाठी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. परंतु कारखाना प्रशासनाने कामगारांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने कामगार संतप्त झाले. त्यांनी गुरुवारी हजारोंच्या संख्येने थेट रस्त्यावर उतरत मोर्चा काढला. मोर्चाला कारखान्यापासून सुरुवात झाली. शहरातील मुख्य रस्त्यावरून हा मोर्चा युववाणी चौक, शिवाजी चौक यामार्गे मुख्य बाजारपेठेतून तहसील कार्यालयाच्या आवारात आला. यावेळी ‘घामाचे दाम मिळालेच पाहिजे’, ‘गली गली मे शोर है कारखानदार चोर है’, ‘वेतन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

तहसील कार्यालयाच्या आवारात मोर्चा आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी कामगार नेते नेताजी पाटील म्हणाले की, १५ वर्षे झाली कामगारांची गळचेपी सुरू आहे. कामगारांचे संसार देशोधडीला लागले. मात्र कारखान्याचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक यांची संपत्ती शेकडो कोटीत गेली आहे. याची चौकशी झाली पाहिजे. आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आता हे आंदोलन मागे घेणार नाही. हा निर्णायक लढा आम्ही जिंकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. प्रसंगी साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा दिला. खराडे म्हणाले, कारखान्याच्या कामगारांना न्याय मिळेपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना कामगारांच्या पाठीशी ठाम उभी राहील. तसेच कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक मनोज सगरे यांच्या संपत्तीची चौकशी करावी आणि त्यांना हटवावे.

बळीराजा संघटनेचे नेते उमेश पाटील म्हणाले, कामगारांच्या कष्टावर हा कारखाना नावारूपाला आला आहे. मात्र कारखाना अध्यक्ष व कार्यकारी संचालक हा कारखाना स्वत:चा असल्यासारखे वागत आहेत. कारखाना हा सभासदांच्या मालकीचा आहे.यावेळी सूरज पाटील, महादेव माळी, उद्धव पाटील, पंडितराव शिंदे, नारायण पाटील, हणमंत कुंभारकर, शहाजी कोळेकर, कलाप्पा फुटाणे, विठ्ठल जाधव, नंदकुमार पाटील यांच्यासह साखर कारखान्याचे हजारो कामगार आंदोलनामध्ये सहभागी होते.राज्यकर्त्यांचे आंदोलनाकडे दुर्लक्षनिवडणुकीवेळी मतांचे राजकारण करणारे, उपेक्षित, वंचित, कामगारांचे स्वत:ला नेते म्हणवून घेणारे राजकीय नेते या आंदोलनाकडे फिरकले नाहीत, याची चर्चा कामगारांमध्ये होती. मते मागायला हे लोकप्रतिनिधी आमच्या दारात येऊ देत, त्यांना आम्ही जागा दाखवून देऊ, असे कामगारांनी यावेळी सांगितले.कामगारांच्या महत्त्वाच्या मागण्या....११ महिन्यांचा थकीत पगार त्वरित द्यावा.३६ महिन्यांची ग्रॅच्युईटी आणि फंडाची रक्कम भरावी.कामगारांना महिन्याच्या महिन्याला पगार देण्यात यावा.कारखाना प्रशासनाची सीबीआय चौकशी करण्यात यावी.शेतकऱ्यांची बिले द्यावीत.कारखान्यावरील कर्जाचा व व्याजाचा आकडा त्वरित जाहीर करावा.संपत्तीची चौकशी कराबळीराजा शेतकरी संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी कामगारांना आधार देत पाठिंबा दिला. प्रभारी कार्यकारी संचालक मनोज सगरे व कारखाना अध्यक्ष यांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी केली.प्रथमच रस्त्यावरकारखान्याच्या स्थापनेच्या इतिहासात प्रथमच कामगारांनी कारखाना प्रशासनाच्या अन्यायाविरोधात एकीची वज्रमूठ बांधत आंदोलन केले. याची तालुकाभर चर्चा होती.

 

टॅग्स :SangliसांगलीStrikeसंप