शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Crime News in Sangli: कामगारानेच मालकाला घातला गंडा, ५५ लाखांचे सोने घेऊन झाला पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 18:02 IST

दोन महिन्यापासून या कामगाराला महिना १२ हजार रूपये पगारावर कामाला ठेवले होते.

विटा : सोने-चांदी गलाई व्यवसायातील कामगाराने मालकाचे ५५ लाखाचे ९६० ग्रॅम सोने आणि रोख ५० हजार रुपये घेवून पलायन केल्याची घटना हरियाणा राज्यातील गुडगाव (गुरूग्राम) येथे शनिवारी घडली. याप्रकरणी संशयित कामगार राजेंद्र शंकर साळुंखे (मूळगाव पारे, ता.खानापूर, जि. सांगली) याच्याविरूध्द गुरूग्राम (हरियाणा) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पारे येथील संताजी शहाजी जाधव यांचे अनेक वर्षापासून हरियाणा येथील गुडगाव (गुरूग्राम) शहरात ओम कॉम्प्युटर गोल्ड टेस्टींग नावाचे सोने-चांदी गलाई दुकान आहे. या दुकानात सोने खरेदी करून ग्राहकांच्या पसंतीनुसार दागिने तयार करून दिले जातात. पारे येथील राजेंद्र साळुंखे याला दोन महिन्यापासून या कामगाराला महिना १२ हजार रूपये पगारावर कामाला ठेवले होते. त्याच्यासोबत झरे (ता.आटपाडी) येथील सचिन अशोक यादव हा कामगारही काम करतो.साळुंखे व यादव हे दोघेही दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहण्यास होते. दि. २३ एप्रिल रोजी सचिन याने दुकानाची साफसफाई केली. त्यानंतर तो आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेल्यानंतर संशयित राजेंद्र साळुंखे याने सचिनच्या पॅन्टमधील खिशातील कपाटातील चावी घेऊन त्यातील रोख ५० हजार रूपये व ९६० ग्रॅम वजनाचे सुमारे ५५ लाख रूपये किंमतीचे सोने घेऊन तेथून पलायन केले.ही घटना दुकान मालक संताजी जाधव यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संशयित राजेंद्र साळुंखे याचा शोध घेतला. परंतु, तो कोठेही सापडला नाही. त्यामुळे जाधव यांनी संशयित राजेंद्र याच्याविरूध्द हरियाणा राज्यातील गुडगाव (गुरूग्राम) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पाच दिवसातील दुसरी घटना...हिवरवाडी (जि. सातारा) येथील सूरज देशमुख यांचा राजस्थानातील सिकर शहरात सोने-चांदी व्यवसाय आहे. या दुकानात घानवड (ता.खानापूर) येथील प्रथमेश होनवार हा तरूण काम करीत होता. दुकान मालक देशमुख हे विवाहासाठी गावी हिवरवाडी येथे आले होते. त्यामुळे दुकानची सर्व जबाबदारी प्रथमेश याच्यावर सोपविण्यात आली होती. त्याने दि. १८ एप्रिल रोजी दुकानातील २ किलो ११० ग्रॅम वजनाचे सोने घेऊन पलायन केले होते.

ही घटना ताजी असताना पारे येथील सोने व्यावसायिक संताजी जाधव यांना त्यांच्याच गावातील राजेंद्र साळुंखे या कामगाराने एक किलो सोने घेऊन ५५ लाख रूपयांचा गंडा घातल्याने खळबळ उडाली आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी