मिरजेत रेल्वे स्थानकात स्टॉलवर कामगाराला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:19 IST2021-06-03T04:19:55+5:302021-06-03T04:19:55+5:30
मिरज : मिरज रेल्वे स्थानकात बुधवारी मध्यरात्री महानंद डेअरी स्टाॅल फोडून चोरट्याने स्टाॅलमधील कामगाराला बेदम मारहाण केली. यावेळी कामगाराच्या ...

मिरजेत रेल्वे स्थानकात स्टॉलवर कामगाराला मारहाण
मिरज : मिरज रेल्वे स्थानकात बुधवारी मध्यरात्री महानंद डेअरी स्टाॅल फोडून चोरट्याने स्टाॅलमधील कामगाराला बेदम मारहाण केली. यावेळी कामगाराच्या आरडाओरड्यामुळे चोरट्याने पलायन केले.
मिरज रेल्वे स्थानकात रात्री दीड वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर असलेल्या महानंद डेअरी स्टाॅलचा दरवाजा तोडून चोरटा आत घुसला. यावेळी स्टाॅलमध्ये झोपलेल्या राकेश भदाैरिया या कामगाराने प्रतिकार केल्यामुळे चोरट्याने त्याला मारहाण केली. राकेश याने आरडाओरडा केल्यामुळे चोरट्याने नवीन ओव्हरब्रिजवरुन अंधारात पलायन केले. दरम्यान, चोरट्याच्या मारहाणीत जखमी झालेल्या राकेशवर रुग्णालयात उपचार करण्यांत आले. प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्याचे चित्रण झाले असून, त्याआधारे रेल्वे पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. मिरजेत बसस्थानक व रेल्वे स्थानक परिसरात रात्रीच्या वेळी लुटमारीच्या घटना वारंवार होत असून, आता चोरट्यांनी रेल्वे स्थानकाकडे मोर्चा वळवल्याने येथील व्यावसायिक हैराण झाले आहेत. याबाबत राकेश भदौरिया यांनी रेल्वे पोलिसात तक्रार दिली आहे.