वाकुर्डे बुद्रुक योजनेचे काम आठ दिवसांत पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:19 IST2021-07-11T04:19:14+5:302021-07-11T04:19:14+5:30

वाकुर्डे उपसा सिंचन योजना अंतिम टप्प्यात असताना कोरोनाची दुसरी लाट आली आणि पाण्याची प्रतीक्षा आणखी दोन महिन्यांनी वाढली. ...

Work on the Wakurde Budruk scheme resumed in eight days | वाकुर्डे बुद्रुक योजनेचे काम आठ दिवसांत पुन्हा सुरू

वाकुर्डे बुद्रुक योजनेचे काम आठ दिवसांत पुन्हा सुरू

वाकुर्डे उपसा सिंचन योजना अंतिम टप्प्यात असताना कोरोनाची दुसरी लाट आली आणि पाण्याची प्रतीक्षा आणखी दोन महिन्यांनी वाढली. लाॅकडाऊनमुळे अधिकारी, कामगारांना कामावर येताना अडचणी वाढल्या. त्यातच कोरोना रुग्ण वाढल्याने रुग्णांना ऑक्सिजन मागणीचे प्रमाण वाढले. त्यामुळे वाकुर्डे उपसा सिंचन योजनेच्या बंदिस्त पाईपलाईन जोडणीसाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन मिळणे बंद झाले. त्याचा परिणाम म्हणून वाकुर्डे योजनेचे काम बंद पडले.

सध्या ऑक्सिजन मिळू लागल्याने वाकुर्डे योजनेचे काम सुरू करण्याबाबत बबन कचरे यांनी कार्यकारी अभियंता देवाप्पा शिंदे, सहायक अभियंता डी. डी. परळे यांनी मानकरवाडी-रेड-कार्वे, ढगेवाडी(आझादनगर), इटकरेच्या ठेकेदार व अधिकाऱ्यांशी गुरुवारी सविस्तर चर्चा केली असून, आठ-दहा दिवसांत पुन्हा काम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती कचरे यांनी दिली.

Web Title: Work on the Wakurde Budruk scheme resumed in eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.