सहा महिन्यांत वाळवा-शिराळा दूध संघाचे काम सुरू हाेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:28 IST2021-01-08T05:28:25+5:302021-01-08T05:28:25+5:30

बहे (ता. वाळवा) येथे वाळवा-शिराळा सहकारी दूध संघाच्या सभासद नोंदणी अभियानानिमित्ताने बहे, नरसिंहपूर, किल्लेमच्छिंद्रगड येथील शेतकरी दूध उत्पादकांशी संवाद ...

The work of Valva-Shirala Dudh Sangh will start in six months | सहा महिन्यांत वाळवा-शिराळा दूध संघाचे काम सुरू हाेणार

सहा महिन्यांत वाळवा-शिराळा दूध संघाचे काम सुरू हाेणार

बहे (ता. वाळवा) येथे वाळवा-शिराळा सहकारी दूध संघाच्या सभासद नोंदणी अभियानानिमित्ताने बहे, नरसिंहपूर, किल्लेमच्छिंद्रगड येथील शेतकरी दूध उत्पादकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी जि. प. चे सार्वजनिक बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, रामदास पाटील, उत्तम पाटील, सुशील सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाडिक म्हणाले, दूध उत्पादकांना गाय, म्हैस खरेदीबरोबर कुट्टा मशीन, धार काढणी यंत्र, गोठा बांधणीस संघाच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य केले जाईल. दूध उत्पादकांना सर्वाधिक बोनस, तसेच सभासदांना सर्वाधिक लाभांश देऊ. संघाच्या माध्यामातून श्रमजीवी, कष्टकरी शेतकऱ्यांना दूध व्यवसायासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवून त्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढीस चालना देणार असल्याचे सांगितले.

ग्रामपंचायत सदस्य सचिन कदम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संपर्कप्रमुख अमोल पाटील यांनी आभार मानले. यावेळी मानसिंग पाटील, लव्हाजी देशमुख, गोरख पाटील, धनंजय शिंदे, राजेखान संदे, सचिन पाटील, मधुकर डिसले, सरगम मुल्ला, हणमंत साळुंखे, युवराज कदम, संतोष पाटील उपस्थित होते.

फोटो : ०७ शिरटे १

ओळ : बहे (ता. वाळवा) येथे राहुल महाडिक यांच्या हस्ते दूध संघाचे सभासदपत्र देण्यात आले. यावेळी जगन्नाथ माळी, लव्हाजी मुसळे, उत्तम पाटील, मानसिंग पाटील, रामदास पाटील उपस्थित होते.

Web Title: The work of Valva-Shirala Dudh Sangh will start in six months