नागजच्या आदर्श प्रशालेचे काम गुणवत्तापूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:31 IST2021-08-25T04:31:54+5:302021-08-25T04:31:54+5:30
नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील आदर्श प्रशालेतर्फे आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते. देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रशालेमध्ये घेण्यात आलेल्या ...

नागजच्या आदर्श प्रशालेचे काम गुणवत्तापूर्ण
नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील आदर्श प्रशालेतर्फे आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते. देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रशालेमध्ये घेण्यात आलेल्या ऑनलाईन चित्रकला, रांगोळी व देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवार, दि. २२ रोजी माध्यमिक शिक्षण अधिकारी विष्णू कांबळे व प्रभारी गटशिक्षण अधिकारी विश्वास साबळे यांच्या उपस्थितीमध्ये झाले. यावेळी कांबळे म्हणाले की, सध्याच्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी सुरक्षिततेची काळजी घेऊन काम करावे लागणार आहे. आदर्श प्रशालेने शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच कला आणि क्रीडा क्षेत्रातही आपली गुणवत्ता टिकवून ठेवली आहे.
यावेळी प्रभारी गटशिक्षणाधिकारी विश्वास साबळे यांनीही शाळेच्या कामाचे कौतुक करून विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांबरोबर पालकही सहभागी होते. यामध्ये प्रतिभा थोरवत, सविता माळी या पालकांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापक संजयकुमार झांबरे यांनीही मनाेगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख सुनीता शिंदे यांनी केले. हिंदी विभागाचे प्रमुख शिवाजी देसाई यांनी स्वागत केले. सहायक शिक्षिका हेमलता कानडे यांनी आभार मानले.