मांगले-काखे पुलाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:29 IST2021-04-23T04:29:33+5:302021-04-23T04:29:33+5:30

मांगले : गेले महिनाभर वारणा नदीवरील मांगले - काखे पुलाचे बंद असलेले काम गुरुवारी पुन्हा सुरू झाले. चिकुर्डे बंधाऱ्यातून ...

Work on Mangle-Kakhe bridge started | मांगले-काखे पुलाचे काम सुरू

मांगले-काखे पुलाचे काम सुरू

मांगले : गेले महिनाभर वारणा नदीवरील मांगले - काखे पुलाचे बंद असलेले काम गुरुवारी पुन्हा सुरू झाले. चिकुर्डे बंधाऱ्यातून तीन फुटाने पाणीपातळी कमी करून नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने हे काम सुरू झाले आहे. चांदोली धरणातूनही पाणी कमी करण्यात आले आहे.

कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्हे जोडणाऱ्या मांगले - काखेदरम्यानच्या या पुलाचे काम चांदोली धरणातून येणाऱ्या पाण्यामुळे आणि चिकुर्डे बंधाऱ्यातील बॅकवॉटरमुळे पंधरा दिवस थांबले होते. अंतिम टप्प्यात आलेल्या पुलाच्या एका पीलरचे काम पावसाळ्यापूर्वी होण्यासाठी पाटबंधारे विभागाने चांदोली धरणातून पाणी कमी करावे, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली होती.

पाटबंधारे विभागाने मंगळवारी चांदोली धरणातून पाणी कमी केले तर गुरुवारी चिकुर्डे बंधाऱ्याचे बर्गे काढून बॅकवॉटर कमी केले. त्यामुळे ठेकेदाराने गुरुवारी दुपारी तत्काळ काम सुरू केले.

ऑक्टोबर महिन्यापासून पुलाच्या उभारणीचे काम गतीने सुरू झाले. सात महिन्यात आठपैकी सात पीलरचे व गाळ्यांचे काम मार्गी लागले आहे. आता फक्त एक पीलर व दोन गाळ्यांचे काम बाकी आहे.

नदीपात्रातील पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ते रखडले होते. आता चार दिवस पाण्याचा प्रवाह कमी राहणार असल्यामुळे एका पीलरसह पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होऊन पुलावरून वाहतूक सुरू होणार आहे.

Web Title: Work on Mangle-Kakhe bridge started