माहेश्वरी युवा संघटनेचे कार्य कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:38 IST2020-12-14T04:38:55+5:302020-12-14T04:38:55+5:30

संजयनगर : सामाजिक बांधिलकी जपत सांगलीतील तरुण भारत स्टेडियम चौकाच्या सुशोभिकरणाचे काम माहेश्वरी युवा संघटनेने केले आहे, हे कार्य ...

The work of Maheshwari Youth Organization is commendable | माहेश्वरी युवा संघटनेचे कार्य कौतुकास्पद

माहेश्वरी युवा संघटनेचे कार्य कौतुकास्पद

संजयनगर : सामाजिक बांधिलकी जपत सांगलीतील तरुण भारत स्टेडियम चौकाच्या सुशोभिकरणाचे काम माहेश्वरी युवा संघटनेने केले आहे, हे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत आंतरराष्ट्रीय भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना यांनी व्यक्त केले.

सांगलीतील तरुण भारत स्टेडियमजवळील चौकाच्या सुशोभिकरणाचे उद्घाटन सांगली जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेतर्फे रविवारी स्मृती मानधना यांच्याहस्ते करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष सत्यनारायण सारडा होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, काँग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महापालिका विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, मनोहर सारडा, संजय सारडा, नगरसेविका उर्मिला बेलवलकर, गोपाळ सारडा, नगरसेवक युवराज बाबडेकर, ओमप्रकाश सारडा, हनुमान तोसनीवाल, राधेश्याम बजाज, पापालाल सारडा, नंदकिशोर मालाणी, पुरूषोतम सारडा, शामसुंदर तोसनीवाल आदी उपस्थित होते.

फोटो-१३दुपटे१.२.३. ७ व ८

फोटो ओळ :

सांगलीतील तरुण भारत स्टेडियमजवळील चौकाच्या सुशोभिकरणाचे उद्घाटन माहेश्वरी युवा संघटनेतर्फे करण्यात आले. याप्रसंगी स्मृती मानधना, संजय बजाज, पृथ्वीराज पाटील, सत्यनारायण सारडा आदी उपस्थित होते. छाया - सुरेंद्र दुपटे

Web Title: The work of Maheshwari Youth Organization is commendable