मदनी ट्रस्टच्या कार्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:26 IST2021-05-13T04:26:09+5:302021-05-13T04:26:09+5:30

कोविडविराेधी लढ्यामध्ये मदनी चॅरिटेबल ट्रस्टने माेठे याेगदान दिले. गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, अपंगांना दिलासा, महापूर काळात पूरबाधितांना केलेली मदत ...

The work of Madani Trust was noticed by the Chief Minister | मदनी ट्रस्टच्या कार्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

मदनी ट्रस्टच्या कार्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

कोविडविराेधी लढ्यामध्ये मदनी चॅरिटेबल ट्रस्टने माेठे याेगदान दिले. गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, अपंगांना दिलासा, महापूर काळात पूरबाधितांना केलेली मदत तसेच काेविडमुळे मृत्यू झालेल्या सर्वधर्मीयांचे अंत्यसंस्कार करून सामाजिक ऐक्य जपले. कोरोनाच्या काळात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी या ट्रस्टने केलेल्या कामाचा अहवाल शासनाकडे पाठविला हाेता. याची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मदनी ट्रस्टसाठी शुभेच्छा संदेश पाठविला.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयंत पाटील यांनी मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, महासचिव सुफियान पठाण यांना मुख्यमंत्र्यांनी पाठविलेले पत्र दिले. यावेळी जयंत पाटील यांनीही मदनी ट्रस्टच्या कार्याचे काैतुक केले.

फाेटाे : १२ ग्राम १

ओळ : सांगलीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठविलेले सदिच्छा पत्र पालकमंत्री जयंत पाटील यांनी मदनी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, महासचिव सुफियान पठाण यांना दिले.

Web Title: The work of Madani Trust was noticed by the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.