कृष्णाकाठ उद्योग समूहाचे कार्य कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:28 IST2021-02-09T04:28:47+5:302021-02-09T04:28:47+5:30
दुधोंडी (ता. पलूस) येथील कृष्णाकाठ उद्योग समूहास त्यांनी सदिच्छा भेटी दिली. यावेळी ते बोलत होते. कृष्णाकाठ उद्योग समूहाचे शिल्पकार ...

कृष्णाकाठ उद्योग समूहाचे कार्य कौतुकास्पद
दुधोंडी (ता. पलूस) येथील कृष्णाकाठ उद्योग समूहास त्यांनी सदिच्छा भेटी दिली. यावेळी ते बोलत होते. कृष्णाकाठ उद्योग समूहाचे शिल्पकार जे. के. बापू जाधव, मानसिंग बँकेचे अध्यक्ष सुधीर जाधव यांनी यांचे स्वागत केले.
सचिन मोटे म्हणाले की, मी फक्त जे. के. बापू जाधव यांचे नाव ऐकून होतो. आज प्रत्यक्षात त्यांना भेटून त्यांचे कर्तृत्व पाहिले. दुधोंडीसारख्या गावात असे उद्योग उभे करून यांनी इतर गावांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती साहेबराव पाटील, प्रदेश सचिव प्रा. नारायण खरजे यांनी आपले मनोगत व्यक्त केली. पलूस कडेगाव विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस राजूशेठ जानकर, वाळवा विधानसभा युवक काँग्रेस माजी अध्यक्ष किरण चव्हाण, मानसिंग बँकेचे संचालक उमेश लाड, अवधूत कस्तुरे, राहुल रूपनवर, विनायक माने, राजूभाऊ अर्जुन, सागर चवरे, जितेंद्र भानूसे, हणमंत मोटे, मानसिंग बँकेचे जनरल मॅनेजर संभाजी जाधव उपस्थित होते.
फोटो-०८दुधोंडी१