गावाच्या विकासासाठी काम करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:27 IST2021-04-02T04:27:27+5:302021-04-02T04:27:27+5:30
फोटो-०१कसबे डिग्रज१ कसबे डिग्रज : तुंग ग्रामपंचायतीची विविध कामे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून केली जातील. तुंगच्या जनतेने आपल्याला ...

गावाच्या विकासासाठी काम करावे
फोटो-०१कसबे डिग्रज१
कसबे डिग्रज : तुंग ग्रामपंचायतीची विविध कामे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून केली जातील. तुंगच्या जनतेने आपल्याला जबाबदारी दिली आहे. आता चांगले काम करावे, असे आवाहन सांगली जिल्हा व्हाॅलीबाॅल संघटनेचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी व्यक्त केला.
तुंग (ता. मिरज) येथील ग्रामपंचायतीस भेटीवेळी ते बोलत होते. सरपंच विमल सूर्यवंशी, उपसरपंच माणिक पाटील यांनी प्रतीक पाटील यांचे स्वागत केले. भास्कर पाटील, धनाजी पाटील, भगवान कदम, भगवान कोळी, रामभाऊ सावंत उपस्थित होते.
प्रतीक पाटील म्हणाले, जनतेने आपणास संधी दिली आहे. नागरिकांच्या अडीअडचणी समजावून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न करावा. जयंत पाटील यांनी आपल्या गावाचा विकास प्राधान्याने विचार करून आपले प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. वाळवा तालुक्यातील गावांपेक्षा मिरज तालुक्यातील या गावावरती त्यांचे विशेष लक्ष आहे.
भगवान कदम यांनी स्वागत केले. उपसरपंच माणिक पाटील यांनी आभार मानले. यावेळी सुभाष कदम, जावेद जमादार, राजू खोत, दीपक यादव, पदमजा नलवडे, चंदा कोळी, मनीषा येळावीकर, प्रमोद पाटील, उमेश पाटील, सत्यजित पाटील उपस्थित होते.