भाजप सरकारकडून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:28 IST2021-02-11T04:28:28+5:302021-02-11T04:28:28+5:30

वांगी : देशातल्या भाजप सरकारने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी तीन काळे कायदे शेतकऱ्यांवर लादले आहेत. देशाच्या प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांवर गुन्हे ...

The work of demolishing farmers by the BJP government | भाजप सरकारकडून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम

भाजप सरकारकडून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम

वांगी : देशातल्या भाजप सरकारने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी तीन काळे कायदे शेतकऱ्यांवर लादले आहेत. देशाच्या प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे पाप या सरकारने केले आहे, असे प्रतिपादन डॉ. जितेश कदम यांनी केले.

वांगी (ता. कडेगाव) येथे कडेगाव तालुका काँग्रेस कमिटी यांच्या वतीने तालुक्यातील विविध पिकांचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. आमदार मोहनराव कदम अध्यक्षस्थानी होते. जि. प.चे माजी सदस्य सुरेश मोहिते, नंदकुमार शेळके, प्रकाश जाधव, सोनहिराचे उपाध्यक्ष पोपटराव महिंद हे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी तालुक्यातील विविध पिकांत विक्रमी उत्पादन घेणाऱ्या आप्पासो एडके (वांगी), हणमंत मोहिते (मौ. वडगाव), आनंदराव पवार (तडसर), सर्जेराव पवार (वडियेरायबाग), नामदेव पाटिल (कमळापूर), रामचंद्र उथळे (येतगाव), दिलीप धनवडे (भाळवणी), दीपक शिंदे (देवराष्ट्रे), विठ्ठल खराडे (हिंगणगाव बु.), दत्तात्रय ननवरे (येवलेवाडी), विनायक साळुंखे (खेराडे विटा), प्रदीप देसाई, अनिल गोरे (कडेगाव), वैभव पोळ (सासपडे), सतीश जाधव (हिंगणगाव खुर्द) या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

जितेश कदम म्हणाले, जय जवान जय किसान हे ब्रीदवाक्य असणाऱ्या देशात केंद्रात असणाऱ्या भाजप सरकारने शेतकऱ्यांवर मोठा अन्याय सुरू केला आहे. अन्यायकारक कायदे करून भांडवलदारांना मोठे करण्याचे काम सुरू केले आहे. किसान सन्मान योजना फसवी आहे. या योजनेपासुन सहा कोटी शेतकऱ्यांना एक कवडीही मिळाली नाही हे वास्तव आहे.

यावेळी सोनहिराचे संचालक सयाजी धनवडे, युवराज कदम, पढरीनाथ घाटगे, सुरेश घाडगे, विजयकुमार मोहिते, आनंदराव मोरे, सुरेश निर्मळ, शंकर मोहिते, सयाजी जाधव, अविनाश येवले, बाबासाहेब सूर्यवंशी, धनाजी सूर्यवंशी, हणमंतराव मोहिते, गोरख कांबळे, महादेव दाईंगडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो : १० वांगी १

ओळ : कडेगाव येथे विक्रमी शेती उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा आमदार मोहनराव कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: The work of demolishing farmers by the BJP government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.