बहे येथे महिला राष्ट्रवादीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:22 IST2021-02-08T04:22:58+5:302021-02-08T04:22:58+5:30

इस्लामपूर : वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बहे येथे गॅस दर वाढीच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन करण्यात आले. महिला राष्ट्रवादीच्या ...

Women's Nationalist Movement at Bahe | बहे येथे महिला राष्ट्रवादीचे आंदोलन

बहे येथे महिला राष्ट्रवादीचे आंदोलन

इस्लामपूर : वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बहे येथे गॅस दर वाढीच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन करण्यात आले. महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा सुस्मिता जाधव यांनी बहे येथील कोंडाबाई बंडगर यांच्या घरासमोर चुलीवर जेवण करीत केंद्र सरकारच्या गॅस वाढीचा जाहीर निषेध केला.

सुस्मिता जाधव म्हणाल्या, केंद्र सरकारने सध्या एकदम पंचवीस रुपयांची दर वाढ केली आहे. या जाचक दर वाढीचा आम्ही महिलांच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत. आज महागाईमुळे जगणे मुश्कील झाले असताना, केंद्राने सारखी गॅस दर वाढ करणे म्हणजे सामान्य कुटुंबांची थट्टा आहे.

आंदोलनात राजारामबापू पाटील कारखान्याच्या संचालिका, जिल्हा उपाध्यक्ष सुवर्णा पाटील, तालुका सरचिटणीस अलका माने, उपाध्यक्ष वैशाली पाटील, सदस्या रेखा पवार, कोंडाबाई बंडगर, शैला अंबी, जयबून शेख, अनिता उगारे, अस्मिता आवळेकर, राजश्री घोडके, सरिता सलगर, सरिता घोडके, राणी चव्हाण, सविता अंबी, आदी सहभागी झाल्या होत्या.

फोटो ओळी-०७०२२०२१-आयएसएलएम- बहे आंदोलन न्यूज

बहे (ता. वाळवा) येथे गॅस दर वाढीच्या निषेधार्थ तालुकाध्यक्षा सुस्मिता जाधव चुलीवर जेवण केले. यावेळी सुवर्णा पाटील, अलका माने, रेखा पवार, कोंडाबाई बंडगर उपस्थित होते.

Web Title: Women's Nationalist Movement at Bahe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.