सांगलीत धूम स्टाईलने महिलेचे सोने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:26 IST2021-03-27T04:26:54+5:302021-03-27T04:26:54+5:30

सांगली : शहरातील बायपास रोडवर महिलेच्या गळ्यातील २२ हजार ४६२ रुपये किमतीची सोन्याची चेन धूम स्टाईलने लांबविण्यात आली. याप्रकरणी ...

Women's gold lampas in Sangli Dhoom style | सांगलीत धूम स्टाईलने महिलेचे सोने लंपास

सांगलीत धूम स्टाईलने महिलेचे सोने लंपास

सांगली : शहरातील बायपास रोडवर महिलेच्या गळ्यातील २२ हजार ४६२ रुपये किमतीची सोन्याची चेन धूम स्टाईलने लांबविण्यात आली. याप्रकरणी स्वाती जालिंदर कोकाटे (वय ३१, रा. प्लॅट नं. ३, सुमती तीर्थ, व्यंकटेश सृष्टी, बायपास रोड, सांगली) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बायपास रोडवरील सुमती तीर्थ अपार्टमेंट फिर्यादीत स्वाती कोकाटे राहण्यास आहेत. गुरुवारी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास त्या व त्यांच्या आई फिरण्यास गेल्या होत्या. फिरून त्या आईसमवेत घरी जात असतानाच, अथर्व लक्झिरीया सोसायटीच्या जवळ समोरून दुचाकीवर दोनजण आले व त्यातील पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने स्वाती यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसडा मारून ओढून घेतली व चोरटे तिथून पसार झाले. काही क्षणातच हा प्रकार घडल्याने दोघीही गोंधळलेल्या दोघींनी आरडाओरडा करीत चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते पसार झाले होते. त्यानंतर त्यांनी शहर पोलिसात संपर्क साधत आपली फिर्याद दाखल केली.

Web Title: Women's gold lampas in Sangli Dhoom style