वृक्षारोपणासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST2021-06-22T04:19:18+5:302021-06-22T04:19:18+5:30
फोटो ओळ ; चिंचणी (ता. कडेगाव) येथे यशोदा कदम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वैशाली कदम, मंगल पाटील, ...

वृक्षारोपणासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा
फोटो ओळ ; चिंचणी (ता. कडेगाव) येथे यशोदा कदम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वैशाली कदम, मंगल पाटील, दिलशाद मुल्ला आदी उपस्थित होत्या.
कडेगाव :
महिला ज्या पद्धतीने आपल्या कुटुंबाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडत असतात, त्याच पद्धतीने त्यांनी वृक्षारोपण व संवर्धनासाठीही पुढाकार घ्यावा,
असे आवाहन यशोदा मोहनराव कदम यांनी केले.
चिंचणी (ता. कडेगाव) येथे आमदार मोहनराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त
रस्त्याच्या दुतर्फा एक हजार वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे. या मोहिमेंतर्गत आमदार मोहनराव कदम यांच्या पत्नी यशोदा कदम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषद सदस्या वैशाली कदम उपस्थित होत्या.
यशोदा कदम म्हणाल्या की, आपले गाव स्वच्छ व सुंदर करण्यासाठी महिलांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. यासाठी वृक्षारोपण व संवर्धनाला अधिक महत्त्व आले आहे.
यावेळी मंगल पाटील
व दिलशाद मुल्ला यांच्यासह महिला उपस्थित होत्या.