महिलांनी एकत्र येऊन संघटना उभारावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:23 IST2021-01-18T04:23:59+5:302021-01-18T04:23:59+5:30
ऐतवडे बुद्रुक : स्त्रीशक्ती जागृत झाल्याशिवाय स्त्रीमुक्ती होणार नाही. महिला अबलेतून सबलीकरणाकडे वाटचाल करतील. परंतु त्यांनी एकत्रित येणे ...

महिलांनी एकत्र येऊन संघटना उभारावी
ऐतवडे बुद्रुक : स्त्रीशक्ती जागृत झाल्याशिवाय स्त्रीमुक्ती होणार नाही. महिला अबलेतून सबलीकरणाकडे वाटचाल करतील. परंतु त्यांनी एकत्रित येणे काळाची गरज आहे. तरी सर्व महिलांनी एकत्र येऊन संघटना उभारावी व मजबूत व्हावे, असे स्पष्ट मत दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आनंदराव थोरात यांनी व्यक्त केले.
कार्वे (ता. वाळवा ) येथे दलित महासंघाच्या महिला शाखेच्या नामफलकाच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. सरपंच संगीता गडकरी यांना आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. महिला आघाडीच्या नामफलकाचे अनावरण वाळवा तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा भारती शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी सारिका थोरात, सुशिला जाधव, डॉ. बी. डी. पाटील, पोपट लोंढे, विठ्ठल गडकरी, राजकुमार पाटील, सुहास कांबळे, गणेश धनवडे, नंदाताई सावंत, गोरख लोंढे, शोभा पाटोळे, सुजाता कांबळे, संगीता कांबळे, मालन कांबळे आदी उपस्थित होते.
फोटो -१७०१२०२१-कार्वे न्यूज
कार्वे (ता. वाळवा) येथे दलित महासंघाच्या महिला आघाडीच्या नामफलक अनावरणप्रसंगी आनंदराव थोरात, सारिका थोरात, बी. डी. पाटील आदी उपस्थित होते.