आष्ट्यातील महिला पदाधिकाऱ्यांची फळप्रक्रिया उद्योगाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:28 IST2021-04-09T04:28:47+5:302021-04-09T04:28:47+5:30

आष्टा नगर परिषदेतील महिला बालकल्याण समितीच्या स्नेहा माळी, पुष्पलता माळी, शारदा खोत, सारिका मदने, सारिका खोत व सहकाऱ्यांनी आदिती ...

Women office bearers from Ashta visit fruit processing industry | आष्ट्यातील महिला पदाधिकाऱ्यांची फळप्रक्रिया उद्योगाला भेट

आष्ट्यातील महिला पदाधिकाऱ्यांची फळप्रक्रिया उद्योगाला भेट

आष्टा नगर परिषदेतील महिला बालकल्याण समितीच्या स्नेहा माळी, पुष्पलता माळी, शारदा खोत, सारिका मदने, सारिका खोत व सहकाऱ्यांनी आदिती फुड्सला भेट देऊन फळप्रक्रिया उद्योगाबाबत माहिती घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : कासेगाव (ता. वाळवा) येथील आदिती फुड्स या फळप्रक्रिया उद्योग समूहाला आष्टा नगर परिषदेतील महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांनी भेट देऊन विविध उपक्रमांची माहिती घेतली.

यावेळी नगराध्यक्षा स्नेहा माळी, सभापती शारदा खोत, उपसभापती पुष्पलता माळी, तेजश्री बोंडे, रुक्मिणी अवघडे, वर्षा अवघडे, मंगल सिद्ध, सारिका मदने, सतीश माळी, संतोष पाटील, पालिकेच्या अधिकारी सारिका खोत यांना आदिती फुड्सचे पृथ्वीराज पाटील व दिनकर पाटील यांनी माहिती दिली. फळापासून विविध पदार्थ तयार करून प्रक्रिया उद्योग सुरु केला असून, त्याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले.

Web Title: Women office bearers from Ashta visit fruit processing industry