हरिपुरात जायन्ट्स ग्रुप ऑफ प्रेरणातर्फे महिलांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:24 IST2021-03-20T04:24:02+5:302021-03-20T04:24:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क संजयनगर : हरिपुरात जायन्ट्स ग्रुप ऑफ प्रेरणा सहेलीकडून महिला दिनानिमित आयोजित विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. ...

Women felicitated by Giants Group of Inspiration in Haripur | हरिपुरात जायन्ट्स ग्रुप ऑफ प्रेरणातर्फे महिलांचा सत्कार

हरिपुरात जायन्ट्स ग्रुप ऑफ प्रेरणातर्फे महिलांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क

संजयनगर : हरिपुरात जायन्ट्स ग्रुप ऑफ प्रेरणा सहेलीकडून महिला दिनानिमित आयोजित विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कारही झाला.

काँग्रेसच्या नेत्या शैलजाभाभी पाटील आणि पूजा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षा अमृता खोत आणि सुनीता शेरीकर, सचिव प्रिया मगदूम यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुनीता शेरीकर यांनी नियोजन केले.

यावेळी अरविंदभाऊ तांबवेकर, उपसरपंच परशुराम शेरीकर, शालन चव्हाण, प्रवीण खोत, सुहेल बलबंड, अमित उजगिरे, मारुती शेरीकर, राजश्री तांबवेकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन हरमित कौर, बीना पाटील, वैशाली माने, दीपा बोंद्रे, शोभा चव्हाण, माधुरी बोन्द्रे , गीता खोकडे, वैशाली हनबर, मालुताई बोन्द्रे, सुचेता काटकर, संगीता तांदळे यांनी केले. अश्विनी गोरे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Women felicitated by Giants Group of Inspiration in Haripur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.