शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: जतमधील दुकानदाराने भगर दळून पीठ तयार केल्याचे स्पष्ट, विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या ३४९ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 18:53 IST

दरीबडची : जत तालुक्यात नवरात्रोत्सवात उपवास करणाऱ्या महिला व पुरुषांना भगरीच्या पिठातून झालेली विषबाधा झाली होती. हे पीठ जगदंबे ...

दरीबडची : जत तालुक्यात नवरात्रोत्सवात उपवास करणाऱ्या महिला व पुरुषांना भगरीच्या पिठातून झालेली विषबाधा झाली होती. हे पीठ जगदंबे ट्रेडिंग कंपनी या व्यावसायिकाने स्वतः दळून तयार केल्याचे चौकशीमध्ये स्पष्ट झाले आहे. हे पीठ त्याने पॅकिंग करून तालुकाभरातील ग्राहकांनी विक्री केली.दरम्यान, रविवारी तालुक्यातील डफळापूर, कुडणूर, जत, बेळुंखी, आवंढी येथील आणखी २४ रुग्णांना विषबाधा झाल्याचे पुढे आले. एकूण बाधित रुग्णसंख्या ३४९ वर पोहोचली आहे. तालुक्यातील २६ गावांत भगरीतून विषबाधा झाली आहे. सर्व रुग्णांवर खासगी व शासकीय रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जतमध्ये वळसंग रस्त्यावरील जगदंबे ट्रेडिंग कंपनीचे घाऊक विक्रीचे दुकान सील केले आहे. दुकानातून ३ लाख ३४ हजार ९१८ किमतीचे विविध कंपन्यांचे भगरीचे नमुने जप्त केले आहेत. त्याचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. चाचणीचा अहवाल एकदोन दिवसांत येणार असल्याचे सांगण्यात आले.अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी अनिल पवार, धनंजय आघाव यांनी जतमध्ये घाऊक व्यापाऱ्यांकडे चौकशी केली. जगदंबे ट्रेडिंग कंपनीचे मालक गणपत मोताराम पटेद यांनी भगरीचे पीठ तालुक्यातील पंधरा ते वीस दुकानांना किरकोळ विक्रीसाठी दिल्याचे निदर्शनास आले.

या गावांत मोठ्या संख्येने विषबाधाजत तालुक्यातील वाळेखिंडी, नवाळवाडी, शेगाव, कुंभारी, मोकाशेवाडी, आवंढी, बनाळी, डफळापूर, कुडणूर, बेळुंखी, वायफळ, संख, माडग्याळ, व्हसपेठ, राजोबाचीवाडी, गुड्डापूर, आसंगी, आबाचीवाडी, वळसंग, सिंगनहळळी, कुलाळवाडी, कोळेगिरी, लकडेवाडी, कुणीकोनूर, टोणेवाडी या गावांमध्ये विषबाधा झालेले रुग्ण मोठ्या संख्येने आहेत.

आरोग्य पथकांमार्फत सर्वेक्षणविषबाधेची घटना उघडकीस येताच आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांतील पथके, आशा वर्कर यांच्यामार्फत गावोगावी सर्वेक्षण करण्यात येत आहे. विषबाधा झालेल्या रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे. तालुक्यातील व्यावसायिकांनी भगर व भगरीच्या पीठाची विक्री करू नये, अशी सूचना प्रशासनाने केली आहे.

जगदंबे ट्रेडिंग कंपनीने स्वतः भगर दळून पीठाचे पॅकिंग केले. त्यातूनच विषबाधा झाली आहे. ग्रामस्थांनी भगरीचे पीठ खाणे टाळावे. चाचणीचा अहवाल आल्यानंतर दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. - अनिल पवार अन्न सुरक्षा अधिकारी, सांगली

टॅग्स :Sangliसांगलीjat-acजाटCrime Newsगुन्हेगारी