विटा शहरात पाण्यासाठी महिला आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:27 IST2021-04-07T04:27:28+5:302021-04-07T04:27:28+5:30

ओळ : विटा येथील मुल्ला गल्लीतील संतप्त महिलांनी सोमवारी पाण्यासाठी नगरपालीकेत धडक मारून संबंधित अधिकारी व कर्मचाºयांना चांगलेच धारेवर ...

Women aggressive for water in Vita city | विटा शहरात पाण्यासाठी महिला आक्रमक

विटा शहरात पाण्यासाठी महिला आक्रमक

ओळ : विटा येथील मुल्ला गल्लीतील संतप्त महिलांनी सोमवारी पाण्यासाठी नगरपालीकेत धडक मारून संबंधित अधिकारी व कर्मचाºयांना चांगलेच धारेवर धरले.

फोटो : अमर शितोळे (सिंगल)

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : शहरातील अनेक भागात सध्या पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट सुरू असून, नियोजनाचा पूर्णपणे बट्ट्याबोळ झाला आहे. त्यामुळे महिला आक्रमक झाल्या असून, सोमवारी मुल्ला गल्लीतील महिलांनी नगरपालिकेत धडक मारून तेथील प्रशासनाला अक्षरश: धारेवर धरले.

पिण्याचे पाणी अपुरे व कमी दाबाने देत असल्याने अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचे सांगत महिला चांगल्याच आक्रमक झाल्या. यावेळी विरोधी नगरसेवक अमर शितोळे यांनी विटेकर नागरिकांना पूर्ण दाबाने व पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करावा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला.

विटा शहरातील जवळपास सर्वच भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. नगरपालिका प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सोमवारी मुल्ला गल्लीतील महिलांनी थेट नगरपालिकेत जाऊन पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. पाणीपट्टी व घरपट्टी सक्तीने वसूल केली जात आहे. मात्र, पाणीपुरवठा वेळेवर व पूर्ण क्षमतेने होत नाही, असे सांगत अधिकाऱ्यांना जाब विचारला.

विटा नगरपालिका ३६५ दिवसांची पाणीपट्टी वसूल करत आहे. मात्र, प्रत्यक्षात निम्मा म्हणजे १८० दिवसही पाणी देत नाही. पाणीपट्टी व घरपट्टी सक्तीने वसूल केली जात आहे. मुल्ला गल्लीसह अन्य भागात आज मोठ्या प्रमाणात घाणीचे सामाज्र आहे. त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप यावेळी संतप्त महिलांनी केला. यावेळी नगरसेवक अमर शितोळे, अनिसा मुल्ला, सुलताना शिकलगार, रेश्मा शिकलगार, नाझ मुल्ला, अय्याज मुल्ला, प्रसाद लिपारे यांच्यासह मुल्ला गल्लीतील महिला उपस्थित होत्या.

चौकट :

तीव्र आंदोलन करणार...

विटेकर नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या मुल्ला गल्लीत ही परिस्थिती असेल तर इतर उपनगरांत पाण्यासाठी लोकांचे काय हाल होत असतील याची कल्पना करता येणार नाही. पालिका प्रशासनाने त्यांच्या कारभारात तातडीने सुधारणा करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी विरोधी नगरसेवक अमर शितोळे यांनी दिला.

Web Title: Women aggressive for water in Vita city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.