इस्लामपुरात मोटारीच्या धडकेत महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:20 IST2021-05-28T04:20:45+5:302021-05-28T04:20:45+5:30

इस्लामपूर : इस्लामपूर - सांगली रस्त्यावरील वाळवा फाटा परिसरात पायी चालत आपल्या शेताकडे निघालेल्या महिलेस मागून भरधाव वेगाने आलेल्या ...

Woman killed in car crash in Islampur | इस्लामपुरात मोटारीच्या धडकेत महिला ठार

इस्लामपुरात मोटारीच्या धडकेत महिला ठार

इस्लामपूर : इस्लामपूर - सांगली रस्त्यावरील वाळवा फाटा परिसरात पायी चालत आपल्या शेताकडे निघालेल्या महिलेस मागून भरधाव वेगाने आलेल्या मोटारीची धडक बसून ती जागीच ठार झाली. ही दुर्घटना गुरुवारी सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास घडली.

संगीता नामदेव क्षीरसागर (४५, रा. लोणार गल्ली, इस्लामपूर) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.

अपघात प्रकरणी मोटारचालक महेश विठ्ठल करे (इस्लामपूर) याच्याविरुद्ध महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंद केला आहे. याबाबत नितीन पंढरीनाथ क्षीरसागर यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

संगीता क्षीरसागर या सकाळी आपल्या पुतण्यासमवेत सांगली रस्त्यावरील लोणारीच्या शेताकडे पायी जात होत्या. त्यावेळी सांगलीकडे भरधाव वेगाने निघालेल्या मोटारीची त्यांना पाठीमागून जोराची धडक बसली. या धडकेत त्या जागीच ठार झाल्या. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे अधिक तपास करत आहेत.

Web Title: Woman killed in car crash in Islampur