कामेरीतील महिलेचा बुधवारी कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:30 IST2021-01-08T05:30:35+5:302021-01-08T05:30:35+5:30

कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे बुधवारी एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत गावातील काेराेनाबाधित मृतांची संख्या ...

A woman from Kameri died of corona on Wednesday | कामेरीतील महिलेचा बुधवारी कोरोनाने मृत्यू

कामेरीतील महिलेचा बुधवारी कोरोनाने मृत्यू

कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे बुधवारी एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत गावातील काेराेनाबाधित मृतांची संख्या सात झाली आहे.

संबंधित ९० वर्षीय महिलेवर इस्लामपूर येथील खासगी कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. या कुटुंबातील व संपर्कात आलेल्या नऊजणांची प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यापैकी एकजण शनिवारी बाधित आढळून आला होता. त्याच्यावर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत. इतर आजणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात सर्वत्र रुग्णसंख्या आटोक्यात येत असताना कामेरीत पुन्हा रुग्ण सापडत असल्याने ग्रामस्थांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आजअखेर एकूण २७१ जण बाधित झाले होते. त्यापैकी २६३ जणांनी कोरोनावर मात केली. सात बधितांचा मृत्यू झाला आहे. एका बाधितावर उपचार सुरू आहेत. अजून कोरोनाचा धोका कायम आहे हे ओळखून सर्व ग्रामस्थांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे. मास्क व सॅनिटायझरचा वापर करून सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन आरोग्य व ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.

Web Title: A woman from Kameri died of corona on Wednesday