सांगली : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल असे आमिष दाखवून २०२० पासून आजपर्यंत सांगलीतील एका महिलेची तब्बल १३ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फसवणूक झालेल्या कविता विनोद चव्हाण (वय ४३, रा. सांगली) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली, त्यानुसार पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. सचिन सिद्धनाथ रोकडे (रा. झाशी काॅलनी, सांगलीवाडी), मिलिंद बाळासाहेब गाडवे (रा. रतनशीनगर, सांगली), अविनाश बाळासाहेब पाटील (रा. उमळवाड, ता. शिरोळ) आणि इरगोंडा बाबगोंडा पाटील (रा. मालगाव, ता. मिरज) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांनी एसएस मार्क ट्रेडिंग नावाने कंपनी स्थापन केली होती. या कंपनीत पैसे गुंतविल्यास त्याद्वारे शेअर बाजारातून तुम्हाला चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखविले होते.
चांगल्या परताव्याच्या आमिषाने सांगलीतील महिलेला १३ लाखांना गंडा, चौघांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 16:08 IST