उसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:27 IST2021-02-10T04:27:00+5:302021-02-10T04:27:00+5:30
मिरजेत सध्या अनेक ठिकाणी रस्ते डांबरीकरण सुरु आहे. या रस्त्यावर बारीक खडी मोठ्या प्रमाणात पसरल्याने अनेक ठिकाणी ...

उसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून महिलेचा मृत्यू
मिरजेत सध्या अनेक ठिकाणी रस्ते डांबरीकरण सुरु आहे. या रस्त्यावर बारीक खडी मोठ्या प्रमाणात पसरल्याने अनेक ठिकाणी दुचाकी घसरून अपघात होत आहेत. शहरातील शास्त्री चौक ते महात्मा फुले चौक दरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या कामासाठी रस्त्यावर खडी पसरल्याने मंगळवारी सायंकाळी दुचाकी घसरून अपघातात कुसुम सौंदे (वय ५०. रा. इनाम धामणी, ता. मिरज) ही महिला जागीच ठार झाली. मृत कुसुम सौंदे या आपल्या मुलीसोबत कर्नाटकातील कागवाड येथून मिरजेत येऊन दुचाकीवरून इनाम धामणीकडे चालल्या होत्या. त्यांची मुलगी गाडी चालवत होती व त्या मागील सीटवर बसल्या होत्या. मिरजेत शास्त्री चौकातून महात्मा फुले चौकाकडे जाताना रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरल्याने मागील सीटवर बसलेल्या कुसुम या रस्त्यावर पडल्या. यावेळी मागून आलेल्या उसाच्या ट्रॅक्टरचे चाक पोटावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. डाेळ्यासमोरच आईचा मृत्यू झाल्याने मुलीचा आक्रोश सुरू होता. शहरात सदोष पद्धतीने शहरात सुरू असलेल्या नवीन रस्त्याच्या कामामुळे महिलेचा बळी गेल्याने घटनेबाबत नागरिक संताप व्यक्त करीत हाेते.