शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माता न तू वैरिणी...सांगलीत १५ दिवसांच्या अर्भकाला टाकून महिलेचे पलायन, पोलिसांकडून शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 16:16 IST

सांगली : पंधरा दिवसांच्या स्त्री जातीच्या अर्भकाला रस्त्याकडेच्या शेतात फेकून महिलेने पलायन केले. कर्नाळ-नांद्रे मार्गावर मंगळवारी सकाळी हा प्रकार ...

सांगली : पंधरा दिवसांच्या स्त्री जातीच्या अर्भकाला रस्त्याकडेच्या शेतात फेकून महिलेने पलायन केले. कर्नाळ-नांद्रे मार्गावर मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला. रस्त्याकडेला रडत असलेले बाळ पाहून शेतात काम करत असलेल्या मजुरांनी ‘त्या’ महिलेचा शोध सुरू केला; परंतु ती मिळून आली नाही. रडत असलेल्या त्या अर्भकाला रस्त्याने जाणाऱ्या महिलांनी आधार देत पोलिसांच्या स्वाधीन केले.कर्नाळ-नांद्रे मार्गावर पश्चिम बाजूस असलेल्या अशोक नारायण रजपूत यांच्या मालकीची शेती आहे. मंगळवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास शेतातील बांधावर असलेल्या एका झाडाखाली बाळ रडत असल्याचे लक्षात आले. यानंतर अर्भकाच्या मातेचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.या अर्भकास दुपट्यामध्ये गुंडाळून त्या महिलेने उघड्यावरच टाकून दिले होते. रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांना हा प्रकार समजताच त्यांनी गर्दी केली. त्यातीलच काही महिलांनी त्या अर्भकास मांडीवर घेत शांत केले. यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. महिला डॉक्टरांनीही यावेळी अर्भकाच्या प्रकृतीची तपासणी केली.याप्रकरणी पोलिस कर्मचारी विष्णू भगवान काळे यांनी फिर्याद दिली असून, २५ ते ३० वर्षे वयाच्या महिलेने हे अर्भक तिथेच टाकून पलायन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार आता पोलिसांनी ‘त्या’ मातेचा शोध सुरू केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिस