मोटेवाडीत सर्पदंशाने महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:28 IST2021-05-09T04:28:15+5:302021-05-09T04:28:15+5:30
संख : जत तालुक्यातील मोटेवाडी (आसंगी तुर्क) येथील फुलाबाई बळवंत मोटे (वय ४८) यांना शुक्रवारी दुपारी अडीचला सर्पदंश झाला. ...

मोटेवाडीत सर्पदंशाने महिलेचा मृत्यू
संख : जत तालुक्यातील मोटेवाडी (आसंगी तुर्क) येथील फुलाबाई बळवंत मोटे (वय ४८) यांना शुक्रवारी दुपारी अडीचला सर्पदंश झाला. त्यांना संख व जत ग्रामीण रुग्णालयात लस मिळाली नाही. सांगलीला घेऊन जाताना वाटेतच सायंकाळी सातला मृत्यू झाला.
शुक्रवारी मोटे घरातून पायरीवरून खाली उतरताना सर्पदंश झाला. संख प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी जत ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तेथे लस मिळाली नाही. नंतर खासगी रुग्णालयातही लस मिळाली नाही.
उपचारासाठी सांगलीला घेऊन जाताना रस्त्यातच मृत्यू झाला. वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाला. त्यांच्या मुलाचा ३ मे रोजी विवाह झाला होता. घरात आनंदी वातावरण असताना मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यापश्चात पती, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.