वारणा कालव्यात पडून महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:09 IST2021-01-13T05:09:06+5:302021-01-13T05:09:06+5:30

कोकरूड :- करुंगली (ता. शिराळा) येथील मनीषा विजय खोपडे (वय ३०) यांचा कॅनॉलच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही ...

Woman dies after falling into Warna canal | वारणा कालव्यात पडून महिलेचा मृत्यू

वारणा कालव्यात पडून महिलेचा मृत्यू

कोकरूड :- करुंगली (ता. शिराळा) येथील मनीषा विजय खोपडे (वय ३०) यांचा कॅनॉलच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी घडली. याबाबतची फिर्याद भाऊ रघुनाथ देवबा पाटील (वय ३९) यांनी कोकरूड पोलिसांत दिली आहे.

कोकरूड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मयत मनीषा खोपडे यांचे मूळ गाव वाकाईवाडी (ता. शिराळा) हे असून गेली पाच वर्षांपासून त्या भाऊ रघुनाथ पाटील यांच्याकडे दोन मुलांसह राहत होत्या. रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास मनीषा या गावातील दोन महिलांसह गवत काढणीसाठी करुंगली गावच्या उत्तर बाजूस वारणा डावा कालव्याकडील भैरी नावाच्या डोंगर परिसरात गेल्या होत्या. दुपारी दीडच्या सुमारास त्या पाणी पिण्यासाठी वारणा डाव्या कालव्याजवळ गेल्या असता तोल जाऊन पाण्यात पडल्या. पोहता येत नसल्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मयत मनीषा यांचा मृतदेह पाण्यामध्ये एका झुडपात अडकला होता. याची फिर्याद भाऊ रघुनाथ पाटील यांनी कोकरूड पोलिसांत दिली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ हे करत आहेत.

Web Title: Woman dies after falling into Warna canal