मिरजेत कोयत्याने हल्ल्यात महिला गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:23 IST2020-12-09T04:23:05+5:302020-12-09T04:23:05+5:30

श्रुती गणेश बजंत्री (वय २८, रा. गंगानगर, नुरानी मशिदीजवळ, मिरज) या कोयताहल्ल्यात जखमी झाल्या. त्यांनी कल्पना विशाल कांबळे ...

Woman critically injured in Miraj attack | मिरजेत कोयत्याने हल्ल्यात महिला गंभीर जखमी

मिरजेत कोयत्याने हल्ल्यात महिला गंभीर जखमी

श्रुती गणेश बजंत्री (वय २८, रा. गंगानगर, नुरानी मशिदीजवळ, मिरज) या कोयताहल्ल्यात जखमी झाल्या. त्यांनी कल्पना विशाल कांबळे व शीला अशोक वाघमारे (दोघी रा. रॉकेल डेपो झोपडपट्टी, मिरज) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

श्रुती बजंत्री यांची दोन मुले भांडत असताना बजंत्री या त्यांना, भांडू नका असे सांगत त्यांच्यावर ओरडत होत्या. त्यावेळी कल्पना कांबळे यांना, त्यांच्याच मुलांना बजंत्री या ओरडत असल्याचे वाटले. त्यामुळे त्यांनी बजंत्री व त्यांच्या आईसोबत भांडण सुरू केले. यावेळी कांबळे यांनी बजंत्री यांना शिवीगाळ करून कोयत्याने त्यांच्या कपाळावर वार केला. जमिनीवर कोसळलेल्या बजंत्री यांना सावरण्यासाठी गेलेल्या त्यांच्या आईलाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे बजंत्री यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत गांधी चौक पोलीस ठाण्यात दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Woman critically injured in Miraj attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.