अमरापूरला ताकारी कालव्यात महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:27 IST2021-05-21T04:27:44+5:302021-05-21T04:27:44+5:30

कडेगाव : अमरापूर (ता. कडेगाव) येथील जयश्री कृष्णत जाधव (वय २७) या महिलेने ताकारी कालव्यात उडी टाकून आत्महत्या केली. ...

Woman commits suicide in Takari canal in Amarpur | अमरापूरला ताकारी कालव्यात महिलेची आत्महत्या

अमरापूरला ताकारी कालव्यात महिलेची आत्महत्या

कडेगाव : अमरापूर (ता. कडेगाव) येथील जयश्री कृष्णत जाधव (वय २७) या महिलेने ताकारी कालव्यात उडी टाकून आत्महत्या केली. पती कृष्णत शंकर जाधव यांनी चिंचणी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जयश्री सोमवार, दि. १७ रोजी रात्री घरातून कोणालाही न सांगता बाहेर पडली होती. तिचा मृतदेह गुरुवारी शिवणी (ता. कडेगाव) येथील हद्दीत सापडला आहे. तिच्या सासूचा गेल्या काही दिवसांपूर्वी मृत्यू झाल्यामुळे तिला मानसिक धक्का बसला होता. त्यातून तिने स्वतः ताकारी कालव्याच्या पाण्यामध्ये उडी टाकून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज चिंचणी - वांगी पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी, उदय माळी करीत आहेत.

Web Title: Woman commits suicide in Takari canal in Amarpur