सांगलीत किरकोळ कारणावरून महिलेस मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:19 IST2021-06-25T04:19:54+5:302021-06-25T04:19:54+5:30

सांगली : शहरातील वडर कॉलनी परिसरात मुलाला कानशिलात का मारले, याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेवर ब्लेडसारख्या धारदार वस्तूने वार ...

Woman beaten for petty reasons in Sangli | सांगलीत किरकोळ कारणावरून महिलेस मारहाण

सांगलीत किरकोळ कारणावरून महिलेस मारहाण

सांगली : शहरातील वडर कॉलनी परिसरात मुलाला कानशिलात का मारले, याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेवर ब्लेडसारख्या धारदार वस्तूने वार करून तिला जखमी करण्यात आले. यात महिलेसह तिच्या पतीस मारहाणही करण्यात आली. याप्रकरणी वर्षा महेश कलकुटगी (वय ३३) यांनी आकाश कलकुटगी (२५) याच्याविरोधात विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी फिर्यादी वर्षा कलकुटगी यांचा मुलगा खेळत असताना संशयित आकाश याने त्याला कानशिलात लगावली होती. त्यानंतर रात्री वर्षा यांचे पती महेश हे आकाशकडे, मुलास कानशिलात का लगावली म्हणून विचारणा करत होते. यावेळी दोघांमध्ये वाद वाढला व संशयित आकाशने महेश यांना शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. फिर्यादी वर्षा मध्यस्ती करण्यासाठी गेल्या असता, संशयिताने त्याच्याजवळ असणाऱ्या ब्लेडने त्यांच्यावर हल्ला केला. यात वर्षा गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार आकाश याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Woman beaten for petty reasons in Sangli