इस्लामपुरात महिलेला मारहाण, शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:20 IST2021-07-15T04:20:10+5:302021-07-15T04:20:10+5:30

इस्लामपूर : शहरातील ओंकार कॉलनीत जागेच्या वादातून एकाने गटारीवरील बांधकाम उद्ध्वस्त करत महिलेला शिवीगाळ, मारहाण आणि दमदाटी केल्याची घटना ...

Woman beaten, abused in Islampur | इस्लामपुरात महिलेला मारहाण, शिवीगाळ

इस्लामपुरात महिलेला मारहाण, शिवीगाळ

इस्लामपूर : शहरातील ओंकार कॉलनीत जागेच्या वादातून एकाने गटारीवरील बांधकाम उद्ध्वस्त करत महिलेला शिवीगाळ, मारहाण आणि दमदाटी केल्याची घटना घडली. हा प्रकार मंगळवारी दुपारी पावणेचारच्यासुमारास घडला.

याबाबत ३५ वर्षीय महिलेने पोलिसात फिर्याद दिली असून, त्यानुसार अक्षय पांडुरंग माने (रा. मोरे कॉलनी), शिवाजी कोळी (रा. ओंकार कॉलनी) आणि पांडुरंग माने (रा. मोरे कॉलनी) या तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

महिलेचे कुटुंब आणि शिवाजी कोळी यांच्यात जागेच्या कारणावरून वाद आहे. तिच्या कुटुंबाने घरासमोरील गटारीवर सिमेंट काँक्रिटचे काम केले होते. कोळी यांचा भाचा अक्षय माने याने मंगळवारी दुपारी दुचाकीवरून येऊन हे बांधकाम उद्ध्वस्त केले. महिलेने त्याला जाब विचारताच त्याने महिलेस ढकलून देऊन शिवीगाळ केली, तर इतर दोघांनी महिलेच्या पतीस व पुतण्यास धक्काबुक्की व शिवीगाळ केली.

Web Title: Woman beaten, abused in Islampur