शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

CoronaVIrus Sangi : कोरोना संसर्गानंतर तीन-चार दिवसांतच रुग्ण गंभीर अवस्थेपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 2:54 PM

CoronaVIrus Sangi : कोरोनाची दुसरी लाट अधिक गंभीर आणि भितीदायक असल्याचे निष्कर्ष वैद्यकीय क्षेत्राला आढळले आहेत. संसर्ग झाल्याच्या तीन-चार दिवसांतच रुग्णाची प्रकृती गंभीर बनत असल्याची माहिती भारती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शहाजी देशमुख यांनी दिली.

ठळक मुद्देकोरोना संसर्गानंतर तीन-चार दिवसांतच रुग्ण गंभीर अवस्थेपर्यंत दुसऱ्या लाटेतील धक्कादायक निष्कर्ष

सांगली : कोरोनाची दुसरी लाट अधिक गंभीर आणि भितीदायक असल्याचे निष्कर्ष वैद्यकीय क्षेत्राला आढळले आहेत. संसर्ग झाल्याच्या तीन-चार दिवसांतच रुग्णाची प्रकृती गंभीर बनत असल्याची माहिती भारती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शहाजी देशमुख यांनी दिली.या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून मृत्यूची संख्याही जास्त दिसत आहे. यावर डॉ. देशमुख म्हणाले की, दुसरा म्युटन्ट गंभीर असल्याचे दिसत आहे. पहिल्या लाटेवेळी संसर्ग झाल्यावर सहा-सात दिवसांनी रुग्णांची प्रकृती गंभीर व्हायची, पण सध्याच्या लाटेत तिसऱ्या चौथ्या दिवशीच अत्यवस्थ होते. त्याचे नेमके कारणही कळत नाही. ऑक्सिजन पातळीबाबतही अशीच निरिक्षणे आहेत.

एखाद्या रुग्णाची सामान्य असलेली ऑक्सिजन पातळी काही तासांतच खालावण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे रुग्णांची अधिक काळजी घ्यावी लागत आहे. संसर्ग दिसल्यानंतरही रुग्ण घरातच उपचार घेत आहेत. प्रकृती गुंतागुंतीची झाल्यावर रुग्णालयात येत आहेत, त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. रुग्णांनी संसर्ग दिसताच डॉक्टरांच्या सल्ल्याने औैषधोपचार सुुरु करायला हवेत.ते म्हणाले की, पहिल्या लाटेत कुटुंबातील एखादी व्यक्ती बाधित झाली तर अन्य सदस्यांना संसर्गाचे प्रमाण कमी होते. या लाटेत मात्र संपूर्ण कुटूंब बाधित होण्याचे प्रमाण जास्त आहे. कोरोनाच्या दुसर्या म्युटेन्टचे हे परिणाम आहेत. त्यामुळेही जिल्ह्याची रुग्णसंख्या जास्त दिसत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीhospitalहॉस्पिटल