येलूरसाठी ५० लाखांचा निधी खेचून आणला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:18 IST2021-06-18T04:18:30+5:302021-06-18T04:18:30+5:30

येलूर येथील विकासकामाचा प्रारंभ राहुल महाडिक यांच्या हस्ते झाला. यावेळी जगन्नाथ माळी, निजाम मुलाणी, राजन महाडिक, सतीश महाडिक उपस्थित ...

Withdrew Rs 50 lakh for Yelur | येलूरसाठी ५० लाखांचा निधी खेचून आणला

येलूरसाठी ५० लाखांचा निधी खेचून आणला

येलूर येथील विकासकामाचा प्रारंभ राहुल महाडिक यांच्या हस्ते झाला. यावेळी जगन्नाथ माळी, निजाम मुलाणी, राजन महाडिक, सतीश महाडिक उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

येलूर : कोरोनाच्या साथीने सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत महाडिक परिवाराने सर्वसामान्य लोकांना मदतीचा हात दिला आहे. येलूर जिल्हा परिषद मतदारसंघ हे आमचे घर व कर्मभूमी आहे. त्यामुळे येथील समस्या पूर्णत: संपल्या पाहिजेत. यासाठी कोरोनाच्या महामारीत ५० लाखांचा निधी खेचून आणला आहे, अशी माहिती वाळवा पंचायत समितीचे गटनेते राहुल महाडिक यांनी दिली.

येलूरमध्ये ५० लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेेचे सभापती जगन्नाथ माळी, जिल्हा परिषद सदस्य निजाम मुलाणी, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजन महाडिक, माजी नगरसेवक सतीश महाडिक यांची उपस्थिती होती.

विकासकामामध्ये प्रामुख्याने कॉंक्रिटीकरण करणे, गटर बांधणे, संरक्षण भिंत बांधणे या कामाचा समावेश आहे. ही सर्व कामे जिल्हा नियोजन समिती, अनुसूचित जाती जमाती नव बौद्ध घटकांचा विकास करणे या योजनेमधील असल्याचे महाडिक यांनी सांगितले.

यावेळी धनाजीराव पाटील, भगवानराव जाधव, भास्करराव पाटील, बाळासाहेब जाधव, विजय पाटील, यशवंतराव जाधव, सरदार सतीश पाटील, अर्जुन पाटील, नरेंद्र गायकवाड, माजी सरपंच बाळासाहेब घेवदे, अभिजित जाधव, ग्रामविकास अधिकारी अशोक खोत उपस्थित होते.

Web Title: Withdrew Rs 50 lakh for Yelur