घाटमाथ्यावरील हवा उंडाळ्यात विरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:18 IST2021-06-23T04:18:16+5:302021-06-23T04:18:16+5:30

फोटो २२०६२०२१-आयएसएलएम-कृष्णा न्यूज दक्षिणेकडील गावात प्रचारात सहकारचे डॉ. सुरेश भाेसले मार्गदर्शन करताना. अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : ...

The wind will blow in the sky | घाटमाथ्यावरील हवा उंडाळ्यात विरणार

घाटमाथ्यावरील हवा उंडाळ्यात विरणार

फोटो २२०६२०२१-आयएसएलएम-कृष्णा न्यूज

दक्षिणेकडील गावात प्रचारात सहकारचे डॉ. सुरेश भाेसले मार्गदर्शन करताना.

अशोक पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : कृष्णेच्या रणांगणात सत्ताधारी सहकार पॅनेलला खिंडित गाठण्याचा डाव रयत आणि संस्थापक पॅनेलने आखला आहे. राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी घाटमाथ्यावर रयतची हवा केली आहे. ही हवा दक्षिणेकडे वाहताना विरळ होताना दिसते. दक्षिणेकडचे काँग्रेसचे अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनी संस्थापक पॅनेलचा झेंडा हातात घेऊन सहकार पॅनेलला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.

गत निवडणुकीत पतंगराव कदम यांनी डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या पॅनेलला नेहमीप्रमाणे ताकद दिली होती. तरीसुद्धा तिरंगी लढतीमध्ये रयत पॅनेलचा धुव्वा उडाला. यावेळी मात्र राज्य सहकार मंत्री विश्वजित कदम यांनी रयत आणि संस्थापक पॅनेलचे मनोमीलन करण्यासाठी पुढाकार घेऊन माजी मुुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माजी मंत्री विलासराव उंडाळकर यांचे चिरंजीव अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांना एकत्रित करून मोट बांधण्याची तयारी केली. परंतु यात अपयश आले. या निवडणूक प्रक्रियेतून पृथ्वीराज चव्हाण यांनी माघार घेतल्याने विश्वजित कदम यांनी रयतच्या प्रचाराचा नारळ फोडला आणि कृष्णेच्या कार्यक्षेत्रात आपला मुक्काम वाढविला. घाटमाथ्यावर रयतचेच पारडे जड होण्यासाठी सभासदांच्या आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठका घेऊन प्रचार मोहीम राबविली. भारती विद्यापीठाची फौज यासाठी उतरवली आहे. हीच फौज आता कऱ्हाड तालुक्यातील वडगाव हवेली, येरवळे, काले, आटके, कार्वे गावांत प्रचारासाठी कार्यरत आहे. परंतु ही घाटमाथ्यावरील हवा दक्षिणेकडील गावात विरळ झाल्याचे दिसते.

यापूर्वीच्या कृष्णेच्या रणांगणात घाटमाथ्यावरील काँग्रसचे स्व. पतंगराव कदम यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते, तर दक्षिणेकडे निर्णायक भूमिका बजावणारे विलासकाका उंडाळकर यांचीही भूमिका महत्त्वाची होती. आता त्यांच्या माघारी त्यांचे चिरंजीव अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनी अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनेलला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या परिसरात रयतची हवा विरळ होताना दिसते. तिन्ही पॅनेलच्या नेत्यांनी कऱ्हाड तालुक्यात उमेदवारी देताना महत्त्वाच्या गावांनाच स्थान दिले आहे.

सहकार पॅनेलने वडगाव हवेली येथील माजी उपाध्यक्ष जगदीश जगताप यांना उमेदवारी दिल्याने संस्थापक पॅनेलनेही याच गावातील अशोक जगताप यांना उमेदवारी देऊन आव्हान उभे केले आहे, तर रयत पॅनेलनेही डॉ. सुधीर जगताप यांना उमेदवारी दिली आहे. येरवळे येथेही सहकार पॅनेलने सयाजी यादव यांना उमेदवारी दिली आहे, तर याच गावात संस्थापकने सर्जेराव लोकरे, तर रयतने सुभाष पाटील यांना उमेदवारी देऊन तोडीस तोड उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे. कृष्णेच्या रणांगणात काले गाव निर्णायक मानले जाते. याठिकाणी तिन्ही पॅनेलने पाटील भावकीला स्थान दिले आहे. सहकारातून दयाराम पाटील, संस्थापकमधून पांडुरंग पाटील, रयततून अजित पाटील एकमेकांविरूद्ध उभे ठाकले आहेत.

आटके येथून सहकारातून गुणवंतराव पाटील, संस्थापक विजयसिंह पाटील, रयततून सयाजी पाटील यांना उमेदवारी देऊन भावकीच्या राजकारणाला फुंकर घातली आहे. कार्वे या ठिकाणीही थोरात भावकीला महत्त्व दिले आहे. सहकारमधून निवासराव थोरात, संस्थापकमधून सुजित थोरात, रयतमधून दत्तात्रय थोरात यांना उमेदवारी देऊन लढतीमध्ये रंगत आणली आहे. एकंदरीत दक्षिणेमध्ये एकमेकांविरूद्ध तगडे आव्हान उभे करण्यासाठी तिन्ही पॅनेल प्रमुखांनी आपली ताकद पणाला लावली असल्याने पूर्वेकडील घाटमाथ्यावरची कदम घराण्याची हवा दक्षिणेकडे विरळ करण्याचा प्रयत्न केला आहे, तर उदयसिंह पाटील यांनी संस्थापक पॅनेलच्या माध्यमातून सहकार पॅनेलपुढे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे.

चौकट

दक्षिणेतील अस्तित्त्वाची लढाई

विधानसभा निवडणुकीनंतर डॉ. अतुल भाेसले यांनी बहुतांश ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले आहे. गत निवडणुकीत उदयसिंह पाटील यांनी काँग्रेस आणि भाजपविरोधात बंडखोरी केली. भविष्यातील राजकारणात उंडाळकर घराण्याच्या अस्तित्त्वासाठी राष्ट्रवादीचे संस्थापक पॅनेलचे नेते अविनाश मोहिते यांना पाठिंबा देऊन भविष्यातील राजकारणाचा वेध घेतला आहे.

Web Title: The wind will blow in the sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.