विलिंग्डनच्या तिघांची उत्कृष्ट एनसीसी कॅडेट म्हणून निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:24 IST2021-03-25T04:24:51+5:302021-03-25T04:24:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : विलिंग्डन महाविद्यालयातील तिघांची कोल्हापूर विभागातील शिवाजी विद्यापीठामधून उत्कृष्ट एनसीसी कॅडेट म्हणून निवड करण्यात आली ...

विलिंग्डनच्या तिघांची उत्कृष्ट एनसीसी कॅडेट म्हणून निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : विलिंग्डन महाविद्यालयातील तिघांची कोल्हापूर विभागातील शिवाजी विद्यापीठामधून उत्कृष्ट एनसीसी कॅडेट म्हणून निवड करण्यात आली आहे.
निवड झालेल्यांमध्ये महाविद्यालयाचे एनसीसी कॅडेट ऑफिसर श्रेयस सुतार, ज्युनिअर अंडर ऑफिसर मणिता पवार, सार्जंट चैत्राली निपाणीकर यांचा समावेश आहे. सांगलीच्या १६ महाराष्ट्र बटालियनच्या वतीने सर्वोत्कृष्ट एनसीसी कॅडेट म्हणून निवड झाल्यानंतर कोल्हापूर येथे झालेल्या विभागीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट कॅडेट परीक्षेत चमकदार कामगिरी दाखवित बहुमान पटकाविला. कोल्हापूरसह पाच जिल्ह्यातील एनसीसी कॅडेटचा यामध्ये समावेश होता.
या सर्वांची लेखी, तोंडी परीक्षा, ड्रिल, फायरिंग, व्यक्तिमत्त्व विकास व सामाजिक उपक्रमातील सहभाग अशा विविध स्तरातून परीक्षण करण्यात आले. त्यांच्या या निवडीने १६ बटालियन तसेच विलिंग्डन महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली आहे. कॅडेटसना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर, कमांडिंग ऑफिसर कर्नल एस. के. बाबू, लेफ्टनंट कर्नल एम. एस. कुलकर्णी, लेफ्टनंट डॉ. जी. डी. शेळके, सुभेदार मेजर मोहन सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.