शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भूमिहीन करणारा 'शक्तिपीठ' नको, अडीच लाखांवर शेतकरी सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविणार 

By अशोक डोंबाळे | Updated: April 13, 2024 18:30 IST

महामार्ग शेती बचाव कृती समितीचा पुढाकार

सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाची आमच्यासह कुणाचीच मागणी नसताना शेतकऱ्यांना भूमिहीन करण्यासाठी कशासाठी करत आहेत. शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, अशी मागणी करणारे निवेदन दोन लाख ५१ हजार शेतकरी पाठविणार आहेत. शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला नाही तर सरकारविरोधात शेतकरी रस्त्यावर येतील, असा इशाराही शेतकऱ्यांनी निवेदनात दिला आहे.शक्तिपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातील १९ गावांतून जात आहे. या सर्व गावांतील हजारो हेक्टर जमीन बाधित होणार आहे. शक्तिपीठ महामार्ग बाधित क्षेत्रातील दोन लाख ५१ हजार शेतकरी मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन पाठविणार आहेत.या निवेदनात म्हटले, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी जमिनी बागायती करण्यासाठी कर्ज काढून भांडवल उभारले आहे. शेततळी काढली आहेत. विहिरी, कूपनलिकांची खुदाई केली आहे. फळझाडांची मोठ्या प्रमाणात लागण केली आहे. हा महामार्ग झाल्यास शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आहे. केंद्र शासनाच्या २०१३ च्या जमीन अधिग्रहण कायद्याची राज्य सरकारने ज्याप्रमाणे मोडतोड केली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला पुरेसा मिळणार नाही. उलट शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. मिरज तालुक्यातील गावांची आणखी बिकट परिस्थिती होणार आहे.दरवर्षी पावसाळ्यात कृष्णा नदीचे पाणी पात्राबाहेर येत असते. अगोदरच रत्नागिरी ते नागपूर महामार्गासाठी भराव पडला आहे. भविष्यात या महामार्गापासून भराव पडल्यास पाण्याचा निचरा होणार नाही. उलट दरवर्षी पूरजन्य परिस्थिती तयार होणार आहे. त्याचा परिणाम सांगली शहर आणि मिरज तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांवर होणार आहे. दरवर्षी पूरजन्य परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. हा महामार्ग ज्या कारणासाठी निर्माण केला जातो आहे, ती देवस्थाने जोडण्यासाठी. या महामार्गाला समांतर असणारा रत्नागिरी ते नागपूर, विजापूर ते गुहागर असे पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत.या नवीन महामार्गाचा अट्टाहास कशासाठी ? शेतकरी, सामान्य नागरिक यांच्या मुळावर येणारा महामार्ग रद्द झाला पाहिजे, म्हणून ही सह्यांची मोहीम राबविण्यात येणार असून, जिल्ह्यातील नागरिकांनी सह्यांच्या मोहिमेत शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख यांनी केले आहे.

कोणत्याही परिस्थितीत 'शक्तिपीठ' नकोच : उमेश देशमुखशक्तिपीठ महामार्ग स्वतंत्र असण्याची काहीच गरज नाही. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गापासून रत्नागिरी, विजापूर ते गुहागर असे अनेक महामार्ग आहेत. या महामार्गापासून जवळच अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. असे असताना हजारो कोटी खर्च करुन शेतकऱ्यांना भूमिहीन करुन ठेकेदारांना जगविण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग करण्याची काहीच गरज नाही. या प्रश्नावर आमचे आंदोलन चालूच असणार आहे, अशी प्रतिक्रिया किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीEknath Shindeएकनाथ शिंदेhighwayमहामार्गFarmerशेतकरी