शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार, निलम गोऱ्हे यांनी दिले आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 15:41 IST

सांगलीत शिवसेनेतर्फे महिला मेळावा

सांगली : लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे वचन दिले होते, ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी येथे दिले.येथील दैवज्ञ भवनमध्ये शिवसेनेचा महिला मेळावा झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी संपर्कप्रमुख सुनिता मोरे, जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, बजरंग पाटील, रावसाहेब घेवारे, संजय विभुते, ज्योती दांडेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.उपसभापती गोऱ्हे म्हणाल्या, प्रतिकूल परिस्थितीत शिवसेनेने अनेक आंदोलने केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन पर्व सुरू केले. या शिवसेनेला शिंदे गट न म्हणता शिवसेना म्हणले पाहिजे. निवडणूक आयोगाने आपल्याला चिन्ह आणि नाव दिले आहे. सांगलीत पुराच्या काळात एकनाथ शिंदे मदतीसाठी धावून आले होते. राज्यातील लाडक्या बहिणींना आणखी काही योजनांचा फायदा देता येईल काय? याची आखणी केली जात आहे. २१०० रुपये देण्याचे वचन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. विरोधकांना मात्र याचा राग आहे. आज आपल्यासाठी रस्ते जसे महत्त्वाचे आहेत, तेवढाच महिलांचा संसारही महत्त्वाचा आहे.त्या पुढे म्हणाल्या, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ सेवा तक्रार प्राधिकरणकडे पाठपुरावा करून जी मुले वृद्धांचा सांभाळ करत नाहीत, त्यांना मदत करावी. बँकांमध्ये लाडक्या बहिणींना सन्मान मिळाला पाहिजे. ज्या बँका नीट वागणूक देत नाहीत, त्यांचा आढावा घेणार आहे. शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ज्या बँका सहकार्य करत नाहीत, त्यांची माहिती मला द्यावी.महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून द्या. सभासद मोहीम राबवा. जिल्हा परिषद गट व गण यामध्ये सर्वांना पदे द्या. महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी पुढाकार घ्या. यावेळी जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, बजरंग पाटील, रावसाहेब घेवारे यांची भाषणे झाली. सुनिता मोरे यांनी स्वागत केले.

शिवसेनेचा महापौर व्हावामाजी जिल्हाप्रमुख रावसाहेब घेवारे म्हणाले, मी ५५ वर्षे शिवसेनेत आहे. एकेकाळी मुंबईनंतर सांगलीची शिवसेना अग्रेसर होती. पुन्हा ते दिवस आले पाहिजेत. सांगलीत शिवसेेनेचा महापौर झाला पाहिजे. मुंबईबरोबर पुन्हा सांगलीचे नाव आले पाहिजे.

टॅग्स :Sangliसांगलीladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाNeelam gorheनीलम गो-हे