शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
2
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
3
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
4
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
5
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
6
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
7
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
8
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
9
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
10
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
12
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
13
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
14
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
15
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
16
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
17
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
18
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
19
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
20
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या

‘अलमट्टी’च्या उंची वाढविण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू - सर्जेराव पाटील 

By अशोक डोंबाळे | Updated: December 20, 2024 18:51 IST

उंची वाढविल्याचा कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना सर्वाधिक फटका

सांगली : अलमट्टी धरणाची उंची वाढवून पाणी पातळी ५२४.२५६ करण्यात येणार आहे. यासंबंधीची घोषणा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. या निर्णयाचा कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना महापुराचा फटका बसणार असल्यामुळे अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील आणि सेवानिवृत्त अभियंता प्रभाकर केंगार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

सर्जेराव पाटील, प्रभाकर केंगार म्हणाले, अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्राला पूर परिस्थितीचा धोका वाढणार आहे. कर्नाटकच्या अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या निर्णयाला सांगलीच्या कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीने विरोध दर्शवला आहे. सध्या अलमट्टी धरणाच्या बॅक वॉटरमुळे सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्याला फटका बसत आहे.जर पुन्हा कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास याची व्याप्ती आणखी वाढून थेट कऱ्हाडपर्यंत आणि कोल्हापूरच्या शिरोळबरोबर कर्नाटकच्या चिकोडीपर्यंत सगळे बुडण्याचा धोका आहे. कर्नाटक सरकारच्या उंची वाढवण्याच्या निर्णयाबाबत महाराष्ट्र सरकारने तातडीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकार याचिका दाखल करणार नसेल तर कृष्णा महापूर नियंत्रण समितीतर्फे जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आताच पूर, उंची वाढविल्यास महापूरसध्या अलमट्टी धरणाची उंची ५१९.६० मीटर इतकी आहे. सध्याच्या उंचीमुळे सांगलीपर्यंत बॅकवॉटर पूर येत आहे. कोल्हापूरच्या नरसोबावाडीपर्यंत फुग निर्माण होते. २००५, २०१९ आणि २०२१ मध्ये अलमट्टीचे बॅकवॉटर सांगली-कोल्हापूरच्या पुराला कारणीभूत असल्याचं समोर आलं होतं. आता अलमट्टी धरणाची उंची पाच मीटरने वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. ५२४.६८ मीटर इतकी उंची करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महापूर कायमचा असेल, असे मत प्रभाकर केंगार यांनी व्यक्त केले.

चार जिल्ह्यांना फटकासांगली, सातारा, कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्याला कृष्णेच्या महापुराचा फटका बसू शकतो. सांगलीच्या पलूसपर्यंतचा बॅक वॉटर, सातारच्या कऱ्हाडपर्यंत जाण्याची शक्यता. कोल्हापूरच्या नरसोबावाडीपासून शिरोळ तालुक्यातील अनेक गाव महापुरात बुडण्याची भीती व्यक्त होत आहे. कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्याला देखील अधिकचा फटका बसण्याची शक्यता आहे. चिक्कोडीपर्यंत अलमट्टी धरणाच्या पाण्याचे बॅकवॉटर जाऊ शकते, अशी भीती देखील प्रभाकर केंगार यांनी व्यक्त केली.

टॅग्स :SangliसांगलीKarnatakकर्नाटकDamधरणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय