सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आग्रही राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:46 IST2021-02-06T04:46:56+5:302021-02-06T04:46:56+5:30
कोकरुड : चरण ग्रामपंचायतीमधील सर्वच पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने गावचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करावा. यापूर्वी चरण गावासह पश्चिम भागातील गावांना ...

सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आग्रही राहणार
कोकरुड : चरण ग्रामपंचायतीमधील सर्वच पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने गावचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करावा. यापूर्वी चरण गावासह पश्चिम भागातील गावांना कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. पुढील काळातही सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्यासाठी आग्रही असणार आहे, असे मत माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी व्यक्त केले.
चरण (ता. शिराळा) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महंमद नायकवडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याबद्दल माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
नाईक म्हणाले, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने ग्रामीण भागातील सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून मोठ्या प्रमाणात योजना सुरू केल्या आहेत. ग्रामपंचायतींना केंद्रामधून थेट निधी मंजूर होत असल्याने ग्रामीण भागामध्ये विकासाला चालना मिळत आहे.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक एम. एस. कुंभार, सरपंच मिलिंद घोलप, मोहन पाटील, लक्ष्मण पाटील, राजाभाऊ नायकवडी, शिवाजी कोळशे, नारायण आमने, शंकर नायकवडी, विक्रम पाटील आदी उपस्थित होते.
फोटो ओळ : चरण (ता. शिराळा) येथे उपसरपंचपदी महंमद नायकवडी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी सत्कार केला. यावेळी एम. एस. कुंभार, मिलिंद घोलप, मोहन पाटील, लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते..
फोटो-०४कोकरुड५