कुसाईवाडीतील विकासकामांना सहकार्य करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:25 IST2021-02-10T04:25:38+5:302021-02-10T04:25:38+5:30
कोकरुड : कोरोनाच्या काळात शिराळा तालुक्यातील कुसाईवाडी गावाने कोरोनासारख्या महाभयंकर आजारास वेशीवर रोखण्याचे काम केले आहे. गावात विकासाची चांगली ...

कुसाईवाडीतील विकासकामांना सहकार्य करणार
कोकरुड : कोरोनाच्या काळात शिराळा तालुक्यातील कुसाईवाडी गावाने कोरोनासारख्या महाभयंकर आजारास वेशीवर रोखण्याचे काम केले आहे. गावात विकासाची चांगली कामे होत असून, शासनाचे चांगले उपक्रम, योजना राबविण्यासाठी योग्य ते सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले.
ते कुसाईवाडी (ता.शिराळा) येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, कोकरुडचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. गटविकास अधिकारी बागल म्हणाले की, कुसाईवाडीने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत जनजागृतीसाठी राबविलेल्या विविध प्रकारच्या स्पर्धा हा स्तुत्य उपक्रम आहे. सरपंचांनी सतत प्रशासनाबरोबर संपर्क आणि पाठपुरावा ठेवल्याने गाव कोरोनामुक्त राहिले.
सहायक पोलीस निरीक्षक वाघ म्हणाले. येथील तंटे होण्याचे प्रमाण फारच कमी असून, जे वाद होतील ते स्थानिक पातळीवर मिटत असल्यामुळे आमचा थोडा ताण कमी होत असून, या गावचा इतरांनी आदर्श घ्यावा.
यावेळी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत विविध गटातील रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व, गायन, निबंध इत्यादी स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास सरपंच विनोद पन्हाळकर, उपसरपंच भास्कर पवार, रामचंद्र पाटील, शिवाजी खोत, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव खोत, आनंदा भुरके, कोमल पन्हाळकर, प्राजक्ता शिंदे, सुभाष पवार, प्रकाश वारंग, गोरखनाथ पवार, सुहास दळवी, दीपक खोत, सुनील पन्हाळकर, विनायक पन्हाळकर, प्रदीप मुदगे, अंकुश मोंडे, सर्व आरोग्य कर्मचारी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.