मिरजेतील रस्ते दुरुस्तीसाठी आयुक्तांच्या बंगल्यावर आंदोलन करणार : शरद पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:32 IST2021-08-25T04:32:30+5:302021-08-25T04:32:30+5:30
पाटील म्हणाले, मिरजेतील प्रमुख रस्ते व शहरातील अंतर्गत रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. वारंवार मुरूम टाकण्यात येत असल्याने पुन्हा ...

मिरजेतील रस्ते दुरुस्तीसाठी आयुक्तांच्या बंगल्यावर आंदोलन करणार : शरद पाटील
पाटील म्हणाले, मिरजेतील प्रमुख रस्ते व शहरातील अंतर्गत रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. वारंवार मुरूम टाकण्यात येत असल्याने पुन्हा चिखल होत आहे. चिखलाने भरलेल्या खड्ड्यातूनच वाट काढताना पावसाळ्यात नागरिकांचे हाल होत आहेत. बेफिकीर प्रशासन व नगरसेवकांना याची फिकीर नाही. दोनच महिन्यांपूर्वी शास्त्री चाैकापर्यंत रस्त्याचे महापालिकेने डांबरीकरण केले. मात्र, रस्ता पुन्हा खराब झाला आहे. मिरजेतील सर्व रस्ते पॅचवर्कची व नुकत्याच झालेल्या शास्त्री चौक रस्त्याच्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. शहरातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती १५ दिवसांत करावी; अन्यथा जनता दलातर्फे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यावर आंदोलन करू.
यावेळी महापालिका क्षेत्र अध्यक्ष ॲड. फैयाज झारी, जिल्हाध्यक्ष ॲड. के.डी. शिंदे, शशिकांत गायकवाड, जनार्दन गोंधळी, समित पाटील, सलीम सय्यद, श्याम कांबळे उपस्थित होते.