शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: चारित्र्यावरुन संशय, झोपेत असतानाच पत्नीचा बांबूने मारून निर्घृण खून; फरार पतीला काही तासांत अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 16:23 IST

गुन्हे अन्वेषणच्या पथकाकडून अटक

सांगली : चारित्र्याच्या संशयावरून बांधकाम कामगार पतीने पत्नी शीलवंती पिंटू पाटील (वय ३०, रा. राजर्षी शाहूनगर, विजयनगर, सांगली) हिचा बांबूने कपाळावर व डोक्यावर हल्ला करून निर्घृण खून केला. गुरुवारी पहाटे हा प्रकार घडला. खुनानंतर पती पिंटू पाटील (वय ३६) हा दोन लहान मुलांना घेऊन पसार झाला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने आंत्रोळी (ता. मंगळवेढा) येथून त्याला ताब्यात घेतले. त्याने खुनाची कबुली दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिंटू पाटील हा मूळचा मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावचा रहिवासी आहे. काही वर्षांपासून तो सांगलीत राहताे. गवंड्याच्या हाताखाली किंवा मजुरीची कामे तो करत होता. मूळच्या नंदूर (जि. सोलापूर) येथील परंतु सांगलीत हनुमाननगरमध्ये स्थायिक असलेल्या शीलवंती हिच्याशी पिंटू पाटीलचे लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. सध्या विजयनगरजवळील राजर्षी शाहूनगर येथे रत्नदीप कारंडे यांच्या बंगल्याचे काम चालू होते. तेथे देखरेखीसाठी असलेल्या शेडमध्ये पिंटू पाटील व शीलवंती दोन मुलांसह राहत होते. शीलवंती ही बांधकामाच्या ठिकाणी पाणी मारायचे काम करत होती, तर पिंटू हा मजुरीवर कामास जात होता.काही दिवसांपासून पिंटू याला शीलवंती हिच्या चारित्र्याचा संशय होता. त्यावरून त्यांच्यात सतत वाद होता. तशातच शीलवंती दि. १३ जून रोजी घर सोडून निघून गेली होती. पिंटूने संजयनगर पोलिस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. शीलवंती ही पुण्याजवळ बहिणीकडे गेली होती. शनिवारी ती घराकडे परत आली होती. त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा चारित्र्याच्या संशयावरून भांडण सुरूच होते. शीलवंती परत आल्यानंतर पिंटूने संजयनगर पोलिसांना सांगितले नव्हते.बुधवारी रात्री पिंटू आणि शीलवंती यांच्यात पुन्हा संशयावरून जोरदार वादावादी झाली होती. त्यानंतर शीलवंती झोपल्यानंतर झोपेत असतानाच तिच्या डोक्यावर व कपाळावर बांबूने मारून खून केला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास दोन्ही मुलांना घेऊन शेडला बाहेरून कडी लावून तो पसार झाला. पिंटूने पलायन केल्यानंतर सांगोल्यातील ओळखीच्या व्यक्तीला हा प्रकार सांगितला. त्या व्यक्तीने संजयनगर पोलिसांना कळवले.

त्यानंतर संजयनगर पोलिसांनी बांधकाम सुरू असलेले ठिकाण शोधले. शेडची कडी काढल्यानंतर आतमध्ये शीलवंती पाटील हिचा खून झाल्याचे आढळून आले. परिसरातील नागरिकांना माहिती समजताच त्यांनी गर्दी केली होती. संजयनगरचे पोलिस निरीक्षक सूरज बिजली आणि पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिस उपअधीक्षक विमला एम. यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यानंतर तपासाबाबत सूचना केल्या.

गुन्हे अन्वेषणच्या पथकाकडून अटकपिंटू पाटील हा खुनानंतर दोन्ही मुलांना घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि संजयनगर पोलिसांचे पथक मंगळवेढा, सांगोला तालुक्याकडे रवाना झाले. आंत्रोळी (ता. मंगळवेढा) येथे गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर संजयनगर पोलिसांच्या ताब्यात आणून दिले.

नातेवाइकांचा आक्रोशशीलवंती पाटील हिची आई, भाऊ तसेच हनुमाननगरमध्ये राहणाऱ्या नातेवाइकांना तिच्या खुनाची माहिती मिळताच ते दुपारी घटनास्थळी आले. त्यांनी शीलवंतीचा मृतदेह पाहून आक्रोश केला. शीलवंतीचा भाऊ आणि आई यांना तिच्या मृत्यूचा धक्का बसल्याचे दिसून आले.